०००००००००००००००
असे केले जाते निदान
- कुठल्याही वयोगटातील व्यक्तीला ताप व पुरळ आल्यापासून २८ दिवसांच्या आत गोवर, रुबेलाची तपासणी करणे आवश्यक आहे.
- त्यामुळे पुरळ आल्यापासून सात दिवसांच्या आत रुग्णाचे रक्तजल नमुने तसेच घशाचा स्वॅब किंवा लघवीचे नमुने तपासले जातात.
-आरोग्य विभागामार्फत प्रयोगशाळेत या नमुन्यांची तपासणी करून निदान केले जाते.
----------------
...तर डॉक्टरांना दाखवा
- गोवर विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे. यात सुरुवातीला ताप येतो.
- तापाशिवाय खोकला, वाहणारे नाक आणि डोळ्यांची जळजळ ही लक्षणे आहेत. लहान पांढरे डाग लक्षणे सुरू झाल्याच्या दोन किंवा तीन दिवसांनंतर तोंडामध्ये तयार होतात.
-तीन ते पाच दिवसांनंतर लाल, सपाट पुरळ बहुधा चेहऱ्यावर येतो, अशात तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
००००००००००००००००००००००
गोवर, रुबेलाचे १०० टक्के लसीकरण
-जिल्ह्यात २०१८ मध्ये गोवर, रुबेलापासून बालकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये गोवर, रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
-या मोहिमेत जिल्ह्यात ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील तीन लाख ११ हजार बालकांना ही गोवर, रुबेला लस देण्याचे नियोजन होते.
-जिल्ह्यातील ११७६ अंगणवाडी केंद्र आणि १३६५ शाळांमधील बालकांचे लसीकरण करण्यात आले.
००००००००००००
आरोग्य अधिकाऱ्याचा कोट
कोट: सद्यस्थितीत सर्वत्र व्हायरल फिव्हरची साथ सुरू आहे. यातील अनेक रुग्णांना डेंग्यू, मलेरियाची लक्षणे आहेत; मात्र रुग्णाला तापासोबतच पुरळ असल्यास ते गोवर, रुबेलाची लक्षणे असू शकतात. ही लक्षणे कुठल्याही वयोगटातील रुग्णांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे नागरिकांनी याकडे दुर्लक्ष न करता आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.
- डॉ. अविनाश अहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम