शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

शेतकºयांच्या प्रस्तावांची छानणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 19:05 IST

वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जवळपास १६ शेतकरी गटांनी अंतिम मुदतीपर्यंत प्र्रकल्प अहवाल सादर केले असून, आता तालुकास्तरावर छानणी सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देकृषी विभाग गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरण योजना 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत वाशिम जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जवळपास १६ शेतकरी गटांनी अंतिम मुदतीपर्यंत प्र्रकल्प अहवाल सादर केले असून, आता तालुकास्तरावर छानणी सुरू झाली आहे. गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना योजनेतंर्गत किमान २० शेतकºयांच्या समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामर्फात विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. या योजनेतर्गंत सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने समूह शेतीस प्राधान्य देण्यात येणार आहे. गट शेती या योजनेतंर्गंत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल. शेतकºयांच्या गटांना प्रगतशील क्षेत्राचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेतीविषयक तांत्रिक सल्लागारांची सेवा या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सामुहिक गोठा, दुग्धप्रक्रिया, अवजारे, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशिम उद्योग, कुक्कुटपालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे आदी कार्यक्रम कृषि संलग्न संबंधित विभागाकडून त्या विभागाच्या प्रचलित निकषाप्रमाणे समूह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.  प्रकल्प आराखड्यात शेतकरी गटाकडील उपलब्ध साधनसामुग्री यासह जमीन सुधारणा, समतलीकरण, सामुहिक सिंचन व्यवस्था निर्मिती, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाबाबत शेतकरी समुह गटाकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान, सामुदायीक संकलन, प्रतवारी साठवणूक व प्रक्रिया केंद्राची निर्मिती, विपणानाबाबत शेतकरी ग्राहक शृखंला विकसित करणे, सामुहिक पशुधन व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश करावा लागणार आहे. प्रकल्प आराखडा सादर करण्याची अंतिम मुदत ६ आॅक्टोंबर होती. या मुदतीपर्यंत जिल्हाभरातून १६ प्रस्ताव सादर झाले असून, तालुका कृषी अधिकारी कार्यालयस्तरावर या प्रस्तावांची छानणी सुरू झाली आहे. छानणी पूर्ण झाल्यानंतर निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.