शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची भीती, गणेशमूर्तीनिर्मितीत ६५ टक्क्यांवर घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:43 IST

-------------- मूर्तीचा आकार ४ फुटांपेक्षा कमीच गतवर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाने करतानाच मूर्तीची उंची ४ ...

--------------

मूर्तीचा आकार ४ फुटांपेक्षा कमीच

गतवर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन शासनाने करतानाच मूर्तीची उंची ४ फुटापेक्षा कमी ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी मूर्तिकारांनी घडविलेल्या ४ फुटांपेक्षा अधिक उंच मूर्ती विकल्याच गेल्या नाहीत. परिणामी त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे यंदा मूर्तिकारांनी ४ फुटांपेक्षा कमी उंचीच्याच मूर्ती घडविल्या आहेत.

-----------------------

प्लास्टरच्या मूर्तीवरील मर्यादांचाही परिणाम

कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करताना प्लास्टरच्या मूर्तीऐवजी शाडूच्या मूर्ती स्थापन करण्याचे आवाहन शासनाने गणेश मंडळे व गणेशभक्तांना केले होते. त्याचाही मोठा फटका मूर्तिकारांना बसला असून, यंदा प्लास्टरच्या मूर्तींची संख्या मोठ्या प्रमाणात घटली असल्याची माहिती कुंभकार समाज संघटनेकडून मिळाली आहे.

----------------------

विक्रेत्यांनाही मिळेना मूर्ती

यंदाचा गणेशोत्सव अवघा १८ दिवसांवर आला असल्याने मूर्तिकारांची तयारी जोरात आहेत. त्यात तयार गणेशमूर्ती घेऊन त्यांची विक्री करणारे व्यावसायिक विविध मूर्तिकारांकडे मागणी नोंदवित आहेत, परंतु अपेक्षित मागणीनुसार मूर्ती मिळत नसल्याने गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचीही मोठी पंचाईत झाल्याचे चित्र दिसत आहे.

०००००००००००००००००००००००००

कोट : आम्ही दरवर्षी लहान, मोठ्या मिळून २००० पेक्षा अधिक गणेशमूर्ती घडवितो. गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशमूर्तीच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला. गतवर्षीच्या १००० हून अधिक मूर्ती आमच्याकडे पडून आहेत. त्यामुळेच यंदा केवळ ५०० ते ५५० मूर्ती घडविणार आहोत. मूर्ती बनविण्याचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

- शाम टेटवार, मूर्तिकार, तथा जिल्हाध्यक्ष, कुंभकार समाज संघटना, वाशिम

---------------------

जिल्ह्यात दरवर्षी तयार होणाऱ्या मूर्ती - ४,००,०००

यंदा अपेक्षित मूर्तीची संख्या - १,४५,०००