शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीची घाई शेतक-यांच्या अंगलट येण्याची भिती

By admin | Updated: June 18, 2017 19:19 IST

मंगरुळपीर तालुक्यातील स्थिती: ३0 टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण.

मंगरुळपीर: यंदा सुरुवातीलाच पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी पेरणीची घाई केली असून, यातील अनेक शेतकर्‍यांना ही घाई अंगलट येण्याची भिती कृषी विभाग व सुज्ञ शेतकर्‍यांच्यावतीने व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्यात १३ ते १५ जूनदरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे बियाणे जमिनीत दबून कुजण्याची भिती निर्माण झाली आहे. मंगरुळपीर तालुक्यात यंदा १५ जूनपयर्ंत १७३.00 मिमी पावसाची नोंद झाली. गतवर्षी याच तारखेपयर्ंत केवळ ७३.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी अडीचपट असल्यामुळे शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी पेरण्याही उरकल्या आहेत; परंतु १३ ते १५ जूनदरम्यान तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या कालावधित केलेल्या पेरण्या उलटण्याची भिती निर्माण झाली आहे. पावसामुळे परेलेले बियाणे जमिनीत दबून कुजण्याची शक्यता अधिक असल्याने १३ ते १५ जूनपयर्ंत पेरणी केलेल्या शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची दाट शक्यता कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आली आहे. तालुक्यात साधारण प्रत असलेल्या शेतजमिनीवरील केलेल्या पेरण्यांना मात्र याची फारशी भिती नसल्याचेही कृषीतज्‍जञांनी म्हटले आहे. तालुक्यात यंदा ६९ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी प्रस्तावित असून, त्यापैकी १७ जूनपयर्ंत एकूण ३0 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यामधील अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या १0 जूननंतरच झालेल्या आहेत. शेतकर्‍यांनी पेरणी करण्याची घाई करू, नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यात यंदाही सोयाबीन आणि तुरीचा पेरा सर्वाधिक होणार असल्याचे स्पष्ट असले तरी, मुग आणि उडिदाचा पेरा वाढण्याचीही शक्यता आहे.