शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील सेवानिवृत्तांचे सहा दिवसांपासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:16 IST

कारंजा लाड : अकोला वाशिम जिल्हा सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघ शाखा कारंजाच्यावतीने थकित वेतन व इतर देयकांच्या पुर्ततेसाठी १६ आॅक्टोंबरपासून कारंजा न.प. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे; परंतु अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न.प. प्रशासनाने अद्यापही घेतली  नाही.  

ठळक मुद्देदखलीची गरजनिवृत्ती वेतनासह विविध उपदानाची रक्कम प्रलंबित

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : अकोला वाशिम जिल्हा सेवानिवृत्त सरकारी व निमसरकारी कर्मचारी संघ शाखा कारंजाच्यावतीने थकित वेतन व इतर देयकांच्या पुर्ततेसाठी १६ आॅक्टोंबरपासून कारंजा न.प. कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहे; परंतु अद्यापही त्यांच्या उपोषणाची दखल न.प. प्रशासनाने अद्यापही घेतली  नाही.  कारंजा न.प.मधील सेवानिवृत्त कर्मचाºयांचे माहे आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याचे निवृत्त वेतन  तसेच सहाव्या वेतन आयोगाची फरकाची रक्कम देण्याबाबत कारंजा न.प. प्रशासनाला संघटनेच्यावतीने लेखी निवेदन सादर करण्यात आले होते.  तसेच कारंजा न.प. मुख्याधिकारी  यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाºयांनी मागण्यांबाबत चर्चाही केली.  त्यानंतर माहे आॅगस्ट या महिन्याचे  सेवानिवृत्त वेतन काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली;परंतुु दिवाळी हा महत्वपूर्ण सण असल्यामुळे सेवानिवृत्तांना माहे आॅगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्याचे निवृत्ती वेतन व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावयास पाहिजे होती,  मुख्याधिकाºयांनी केवळ एक महिन्याचे वेतन कबुल केले तसेच सहाव्या वेतन आयोगाच्या  फरकाची  रक्कम नाकबुल केली. विशेष म्हणजे  मुख्याधिकाºयांनी नियमित न.प.कर्मचाºयांना सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम अदा केली आहे.  बरेचशे  सेवानिवृत्त कर्मचारी विविध आजारांनी ग्रस्त आहे. त्यांना औषधोपचारांकरिता दरमहा पैशाची अत्यंत आवश्यकता असते. याच मागण्यांसाठी निवृत्त कर्मचºयांनी कारंजा न.प.कार्यालयासमोर १६ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजतापासून बेमुदत उपोषणास प्रारंभ केला आहे. दिवाळीच्या सुटी काळातही सेवानिवृत्त कर्मचाºयांनी उपोषण सोडले नाही. दिवाळी सारख्या महत्वपूर्ण सणादरम्यान  सेवानिवृत्त कर्मचारी बेमुदत उपोषण करीत आहेत. जोपर्यंत मागण्यांची पुर्तता होत नाही तोपर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार तसेच वेळप्रसंगी आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही या निमित्ताने  देण्यात आला आहे. 

सेवानिवृत्त कर्मचाºयांचे केवळ महिनाभराचे वेतन थकित आहे. त्याशिवाय सहाव्या वेतन आगोगातील फरकाची रक्कम ुदेण्याची त्यांची मागणी आहे. कोणत्याही सेवानिवृत्तावर अन्याय होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे; परंतु त्यांचे सर्व उपदान आणि वेतन पालिकेला स्वत:च्या निधीतूनच अदा करावे लागते. सध्या निधी नसल्यामुळे ते प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध होताच. त्यांचे थकित वेतन आणि इतर मागण्या निकाली काढू.- प्रमोद वानखडे, मुख्याधिकारी, न.प. कारंजा.