शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून आकार घेताहेत शेततळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:27 IST

पानी फाउंडेशनकडून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने वॉटरकप स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत ...

पानी फाउंडेशनकडून गावांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने वॉटरकप स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेत वॉटरकप स्पर्धेत सहभागी गावांनाच सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरूळपीर तालुक्यातील मिळून ६१ गावांचा समावेश आहे. या गावांत स्पर्धेअंतर्गत विविध कामेही केली जात आहेत. त्यात नाडेप, खत, वृक्षलागवडीसह जलसंधारणाच्या विविध कामांचा समावेश आहे. पानी फाउंडेशनची टीम आणि प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी ही कामे करीत आहेत. त्यात प्रशासनाच्या सहकार्याने गावकरी लोकसहभागातून शेततळ्यांची उभारणी करीत आहेत.

कारंजा तालुक्यतील विळेगाव, जानोरी, बांबर्डा, तर मंगरूळपीर तालुक्यातील तपोवन, बोरव्हा, पारव्हासह इतर इतर काही गावांत जलसंधारणाची कामे वेगाने होत आहेत.

-------

बॉक्स :

जानोरीतील शेततळे वेधतेय लक्ष

समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी असलेल्या कारंजा तालुक्यातील जानोरी गावात प्रशासनाच्या सहकार्याने गावकऱ्यांनी भव्य शेततळ्याची निर्मिती केली आहे. अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने या शेततळ्याची निर्मिती करण्यात आली असून, शेततळ्यात पाणी जमा होण्यासाठी सोडलेल्या भागात खडी आणि दगड टाकण्यात आले आहेत. ज्यामुळे वाहून येणाऱ्या पाण्यातील कचरा आणि गाळ बाहेरच अडणार आहे, हे शेततळे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

-----