शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

By admin | Updated: March 17, 2017 03:29 IST

संत्रा, आंबा पिकांचे नुकसान ; सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात.

वाशिम, दि. १६- जिल्हय़ात सर्वदूर गुरुवार, १६ मार्च रोजी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. मानोरा, मंगरूळपीर, शेलूबाजार परिसरातील काही गावांना गारपिटीने झोडपले. प्रशांत प्रल्हाद हिरपूरकर (रा. वनोजा, ता. मंगरूळपीर) यांच्यासह इतर शेतकर्‍यांच्या संत्र्याचे वादळी वार्‍यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कडक उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच गुरुवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपात, गारांसह झालेल्या या पावसामुळे प्रामुख्याने आंबा आणि संत्रा पिकाचे नुकसान झाले आहे. मंगरुळपीर तालुक्यात गहू, हरभरा, संत्र्याचे नुकसानमंगरुळपीर तालुक्यात १६ मार्च रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी, वादळी पावसाने गहू, हरभरा यासह संत्रा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तालुक्यात यावर्षी पाण्याचा साठा लक्षात घेऊन अनेक शेतकर्‍यांनी हरभरा गहू, भाजीपाला, कांद्याची लागवड केली होती; मात्र १६ मार्चला झालेल्या वादळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. सोसाट्याचा वारा व विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. यादरम्यान काही काळापुरते जनजीवन विस्कळीत झाले होते; परंतु लवकरच पाऊस थांबल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. तांदळी येथे उभा गहू जमीनदोस्त, कांदा बीजाचेही नुकसानवाशिम आणि अकोल्याच्या सीमेवरील तथा वाशिम जिल्हय़ाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या तांदळी या गावात आज दुपारी वादळी वार्‍यासह, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे गव्हाचे उभे पीक जमीनदोस्त झाले. यासह कांदा बीजाचेही अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.