शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांनो, अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करा!

By admin | Updated: July 2, 2017 08:56 IST

शेतक-यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत बदल घडवून भरघोस उत्पन्न मिळवावे, असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी मांडले. स्थानिक जिल्हा परिषद सभागृहात १ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषिदिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, आरोग्य व शिक्षण सभापती सुधीर गोळे, महिला व बालकल्याण सभापती यमुना जाधव, समाजकल्याण सभापती पानुबाई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, ह्यआत्माह्णचे प्रकल्प संचालक डी.एल. जाधव, कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी प्रा. डॉ.बी.डी. गीते, करडा कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ निवृत्ती पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विश्वनाथ सानप म्हणाले, की कृषिदिन हा सर्वार्थाने शेतकऱ्यांचा दिवस आहे. कै. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रात हरितक्रांती निर्माण केली. त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीत बदल करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील, गीते, निवृत्ती पाटील यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. याप्रसंगी उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी नामदेव नागरे, संजय कानड, शेखर सानप, विठ्ठल ब्रम्हेकर, ध्रुव राठोड, रामराव ठाकरे आदींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मंगरुळपीर पंचायत समिती कृषी विभागाचे कृषी अधिकारी शेळके आणि जिल्हा परिषद ग्रामविकास अधिकारी सुनील इंगळे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.चे जिल्हा कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापात्रे यांनी केले. संचालन कृषी अधिकारी शेळके यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.