ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील घटनाविषारी द्रव्य प्राशन करुन जीवनयात्रा संपविली
लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : मंगरुळपीर तालुक्यातील दाभा येथील रामभाऊ सवाईराम जाधव नामक शेतकºयाने नापिकी व कर्जाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना १७ आॅगस्टला उघडकीस आली. रामभाऊ जाधव यांचेकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी शेतीसाठी कर्ज काढले होते. नापिकीमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य झाले नाही. आताही पावसाने दडी मारल्याने ते चिंताग्रस्त होते. या चिंतेतून त्यांनी दाभा परिसरातील शेतशिवारात विषारी द्रव्य प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. जाधव यांच्याकडे ३० हजाराच्या वर बँकेचे कर्ज होते. यासंदर्भात आकाश जाधव यांनी फिर्याद दिल्याने मंगरूळपीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.