शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी पुत्राने विपरित परिस्थितीतही मिळविला "आयआयटी"ला प्रवेश!

By admin | Updated: July 13, 2017 19:56 IST

पवई येथे शिक्षण: वाशिम तालुक्याच्या गिव्हा येथील रवि भुसारी याची भरारी

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: कोणतीही उच्च शिक्षणाची परंपरा कुटूंबात नसताना आणि जेमतेम परिस्थितीत वातावरणाची साथही नसताना केवळ जिद्दीच्या जोरावर आयआयटीला प्रवेश मिळविण्याची किमया वाशिम तालुक्यातील शेतकरी कुटूंबातील मुलाने केली आहे. रवि बालकिसन भुसारी, असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो वाशिम तालुक्याच्या गिव्हा येथील रहिवासी आहे. वाशिम तालुक्यातील गिव्हा येथे बालकिसन भुसारी हे त्यांच्याकडे असलेल्या ७ एकर कोरडवाहू शेतीत राबून आपल्या कुटूंबाचा सांभाळ करतात. कोरडवाहू शेती असल्याने पोट भरण्यापेक्षा फारसे अधिक उत्पन्न त्यांना होत नाही. वृद्ध आई-वडिल, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी, असे त्यांचे कुटुंब आहे. या परिस्थितीतही त्यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. विशेष म्हणजे त्यांचे स्वत:चे शिक्षण केवळ मॅट्रिकपर्यंत असतानाही त्यांनी मुलांवर शैक्षणिक संस्कार घडविले. त्यांच्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यात त्यांचा थोरला मुलगा रवि यानेही कुठलीच कसर ठेवली नाही. घरात उच्च शिक्षणाची परंपरा नसतानाही त्याने केवळ जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर आयआयटीपर्यंत झेप घेतली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. या ठिकाणी कठोर परीश्रम करून त्याने जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आणि जवाहर नवोदयमधून उच्च माध्यमिकची परिक्षा देताना ९१. ८० टक्के  गुणांसह प्राविण्य प्राप्त केले. आयआयटी करण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून मुंबई येथे मोफत मार्गदर्शन करणाऱ्या शिकवणी वर्गात प्रवेश मिळविला. या ठिकाणी अथक परीश्रम करताना त्याने आयआयटीसाठी आवश्यक असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स परिक्षेत इतर मागासप्रवर्गात ३६६ पैकी २१२ गुण पटकावून देशात इतर मागास प्रवर्गातून ८०० वा क्रमांक पटकावला. या यशामुळेच त्याचा आयआयटीसाठी प्रवेश निश्चित झाला. पवई येथे आयआयटीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेला त्याला प्रवेश मिळाला. अशी कामगिरी करणारा तो गिव्हा येथील पहिला आणि एकमेव विद्यार्थी ठरला आहे. त्याला यासाठी प्रोत्साहन मिळाले, ते त्याचे आजोब रामराव तुकाराम भुसारी यांचे. तसेच आई-वडिल, शिक्षक, शाळेचे प्राचार्य यांचे मार्गदर्शन लाभले.