शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ!

By admin | Updated: July 14, 2017 01:47 IST

प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळेना : विमा रक्कम भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : खरीप हंगाम २०१७ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील नऊ पिकांना पेरणीपासून ते काढणीपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे. असे असले तरी पावसाअभावी अंकुरलेली पिके कोमेजण्याच्या मार्गावर असून दुबार, तिबार पेरणीचे संकटही ‘आ’ वासून उभे असल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे सपशेल पाठ फिरवल्याची माहिती सूत्रांनी दिली.सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश आहे. तसेच भात पिकासाठी वाशिम, रिसोड व मालेगाव तालुक्याचा समावेश असून भुईमुग पिकासाठी मालेगाव, कारंजा व तीळ पिकासाठी वाशिम, मानोरा, कारंजा तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. तसेच अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणीला त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे, असे प्रशासनाने यापुर्वी अनेकवेळा जाहीर केले. शेतकऱ्यांनी आपले विमा प्रस्ताव बँकेकडे सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०१७ पर्यंत आहे. प्रस्तावासोबत सातबारा, ८ अ उतारा, पिक पाहणी झाली असल्यास पेरणीबाबतचा तलाठ्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. असे असतानाही शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली असून या योजनेला कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती कृषी विभागातील अधिकृत सूत्रांनी दिली आहे. भाताचे उत्पादन नसताना पीक विमा योजनेत समावेशजिल्ह्यात अधिकांश शेतकरी पारंपरिक पिकांचे उत्पादन घेतात. त्यात प्रामुख्याने सोयाबिन, तूर, मुग, उडिद, कापूस, ज्वारी, भूईमुग या पिकांचा समावेश होतो. मात्र, अधिक प्रमाणात पाणीच मिळत नसल्याने भात या पिकाचे उत्पादन जिल्ह्यात कुठेही घेतले जात नाही. असे असताना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वाशिम, रिसोड आणि मालेगाव तालुक्यांचा भात या पिकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय तीळाचेही उत्पन्न फारसे घेतले जात नसताना हे पीकही योजनेत समाविष्ट आहे.