वाशिम : खरिप हंगाम जवळ येत असल्याने पीककर्जाची रक्कम मिळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, रोकड टंचाईचा प्रश्न अद्यापही बहुतांशी निकाली निघाला नसल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. खरिप हंगामासाठी जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना यंदा ११५० कोटी रुपये कर्जवाटपाचे उद्दीष्ट असून ३१ मे २०१७ पर्यंत पीककजार्चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. आता खरिप हंगाम जवळ येत आहे. त्यामुळे पीककर्ज काढण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी होत आहे. दुसरीकडे पीककर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकेतून पीककर्जाची रक्कम काढण्यासाठी रांगेत उभे राहूनही पुरेशी रक्कम मिळेनाशी झाली आहे. १२ मे पर्यंत ७०० कोटी रुपयांच्यावर पीककर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे.
पीककर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By admin | Updated: May 14, 2017 20:07 IST