शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा येथील आक्रोश सभेला शेतक-यांचा प्रतिसाद

By admin | Updated: June 11, 2017 02:07 IST

मान्यवरांची उपस्थिती; शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध.

लोकतमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी ९ जून रोजी कारंजा येथील तहसील कार्यालय परिसरात शेतकरी आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला तालुक्यातील शेतकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कारंजा येथे आयोजित शेतकरी आक्रोश सभेत आमदार बच्चू कडू, शेतकरी नेते चंद्रकांत वानखडे, ब्रिगेडीयर सुधीर सावंत, कारंजा-मानोराचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, डॉ. सुभाष राठोड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांची उपस्थिती होती. १ जूनपासून राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात राज्य शासनाच्या धोरणाबाबत शेतकरी आपला संताप व्यक्त केली आहेत. शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालास योग्य हमीभाव, अशा विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. या सभेला संबांधित करताना आमदार बच्चू कडू म्हणाले, की राज्य शासन शेतकर्‍यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंंत आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणावर टिकाही केली. चंद्रकांत वानखडे , कारंजा-मानोराचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश डहाके, डॉ. सुभाष राठोड , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक श्रीधर कानकिरड, जिल्हा परिषद सदस्य मोहन महाराज, शेतकरी नेते गजानन अमदाबादकर यांनीही यावेळी शासनाच्या धोरणावर टीका करताना शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी मिळाल्याशिवाय आंदोलन मिटणार नसल्याचे सांगितले. या शेतकरी आक्रोश सभेला तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांची उपस्थिती होती. यावेळी पावसानेही हजेरी लावली होती.राज्यभरात सुरू असलेल्या शेतकरी संपाला कारंजा तालुक्या चांगलाच प्रतिसाद लाभत असून, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धारही शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.