शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

‘एक्स्प्रेस वे’च्या विरोधासाठी शेतकरी धडकले तहसीलवर!

By admin | Updated: August 2, 2016 01:48 IST

‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आणि कृषी समृद्धी हब’ ला विरोध करण्यासाठी तालुक्यातील रिधोरा, सुकांडा, इरळा, ब्राह्मणवाडा परिसरातील शेकडो शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर धडकले.

रिधोरा : नागपूर ते मुंबई या प्रस्तावित ह्यसुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे आणि कृषी समृद्धी हबह्ण ला विरोध करण्यासाठी तालुक्यातील रिधोरा, सुकांडा, इरळा, ब्राह्मणवाडा परिसरातील शेकडो शेतकरी मालेगाव तहसील कार्यालयावर धडकले आहेत. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. जिल्हय़ातील कारंजा तालुक्यातील १८ गावे, मंगरूळपीर १0 गावे, मालेगाव २0 गावे; तर रिसोड १ अशा ५९ गावांच्या ११0 किलोमीटर अंतरावरील शेतजमिनीतून नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे जाणार आहे. यामध्ये शेकडो हेक्टर जमीन संपादीत केली जाणार असून, मालेगाव तालुका, शेलुबाजार व कारंजा तालु्क्यात कृषी समृद्धी हब बनविणे प्रस्तावित आहे. यामध्ये जमीन संपादित होणार असल्याने भूमिहीन होण्याची भीती शेतकर्‍यांना असून, ह्यएक्स्प्रेस वे आणि कृषी हबह्ण ला शेतकर्‍यांचा विरोध होत आहे. रिधोरा परिसरातील शेकडो शेतकर्‍यांनी एकत्रित येत सोमवारी मालेगाव तालुक्यातील तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. रिधोरा, सुकांडा परिसरातील शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी बागायती असतानाही, महसूल दप्तरी याची नोंद नाही. जमिनी संपादित झाल्या तर अख्ख्या कुटुंबांना भूमिहीन होण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करून जमीन संपादनाला शेतकर्‍यांनी विरोध दर्शविला. कृषी समृद्ध हब करावयाचा असल्यास मालेगाव तालुक्यातील वरदरी परिसरात मोठय़ा प्रमाणात शासनाची इ-क्लास व वन विभागाची जमीन आहे. ही जमीन संपादित करून शासनाने कृषी हब उभारावा, असे शेतकर्‍यांनी निवेदनात म्हटले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे, शिवाजी केकन, संदीप सावळे, अनिल इंगोले, गजानन तारे, जैसिंगराव घुगे, विष्णू ठाकरे, जगन ठाकरे, विजय भालेराव, गणेश ठाकरे, बाबाराव घुगे, संतोष घुगे, विनोद घुगे, बबन पाटील यांच्यासह २00 ते ३00 शेतकरी उपस्थित होते.