शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज अद्याप मिळालेच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:16 IST

बँकांचे कानावर हात : शासकीय धोरण ठरतेय तकलादू

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट १.५ लाख रुपये कर्जमाफी जाहीर केली. सोबतच जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमित भरतात, त्यांना २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत शेतकऱ्यांना अग्रीम १० हजार रुपयांचे कर्ज तातडीने मंजूर करण्याचे निर्देश होते; मात्र राष्ट्रीयीकृत बँकांकडून अद्याप कुठल्याच शेतकऱ्यास १० हजार रुपये कर्ज देण्यात आलेले नाही. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही या स्वरूपातील कर्ज वाटप प्रक्रिया बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.शासनाने २८ जून २०१७ रोजी कर्जमाफीसंदर्भातील अटी, शर्ती आणि निकष शिथिल करीत १ एप्रिल २०१२ नंतरच्या व ३० जून २०१६ पर्यंतच्या थकीत पीक कर्जाला माफ करण्याचा निर्णय घोषित केला. त्यानंतर निर्णयात बदल होत २००९ पासून थकीत असलेले शेतकरी कर्जमाफीस पात्र होतील, असे जाहीर झाले. दरम्यान, ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व शाखांमधून तत्काळ दहा हजारांचे अग्रीम कर्ज देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले; मात्र २१ जून २०१७ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना राष्ट्रीयीकृत बँकांनी अद्याप ही प्रक्रियाच सुरू केलेली नाही. शेतकऱ्यांना १० हजार रुपये अग्रीम कर्ज देण्यासंदर्भात आरबीआयच्या कुठल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळेच राष्ट्रीयीकृत बँकांनी या स्वरूपातील कर्ज वाटपास सुरुवात केलेली नाही. निर्देश प्राप्त झाल्यास तत्काळ अंमलबजावणी केली जाईल.- विजय नगराळे,व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक