शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

खत दरवाढीमुळे कोलमडतेय शेतकऱ्यांचे बजेट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:37 IST

वाशिम : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी वाढ केल्याने कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे बजेट कोलमडून ...

वाशिम : रासायनिक खत कंपन्यांनी खताच्या दरामध्ये गोणीमागे जवळपास ६०० ते ७०० रुपयांनी वाढ केल्याने कोरोनाकाळात शेतकऱ्यांचे बजेट कोलमडून जात आहे. जिल्ह्यासाठी ६० हजार मे.टन खतसाठा मंजूर झालेला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होत असते. खरीप व रब्बी हा हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिक वाहिनी म्हणून ओळखला जातो. सन २०१८-१९ पासून दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी शासन, प्रशासनाकडून उभारी देणे गरजेचे असतानाच, रासायनिक खताच्या किमतीमध्ये कंपन्यांनी भरमसाठ वाढ केली आहे. आगामी खरीप हंगामात वेगवेगळ्या रासायनिक ६० हजार मेट्रिक टन खतसाठा मंजूर झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये रासायनिक कंपन्यांनी खताच्या किमती वाढविल्याने बळीराजा हैराण झाला आहे. डीएपी १२०० रुपये प्रतिगोण मिळणारी आता १८०० ते १९०० रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यावर्षी प्रत्येक गोणीमागे ६०० ते ७०० रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत, तर दुसरीकडे १०:२६:२६ खताची ११७० रुपयांना मिळणारी गोणी आता जवळपास १७०० रुपयांवर पोहोचली आहे. १२:३२:१६ खताची ११८४ रुपयांना मिळणारी गोण आता जवळपास १७५० रुपयांना खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.