शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: October 9, 2016 01:39 IST

सुक्ष्म सिंचनाच्या अनुदानासाठी मालेगाव तालुक्यातील दोन हजार लाभार्थ्यांंच्या कार्यालयात वा-या.

वाशिम, दि. 0८- राष्ट्रीय सूक्ष्म अभियानाअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा उपयोग करणार्‍या हजारो शेतकर्‍यांवर अनुदानासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली असून, मालेगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार ५0 शेतकरी मागील अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाचा घोळ सुटला नसल्याने त्याचा परिणामही सिंचन व्यवस्थापनावर होऊ लागला आहे.एकिकडे सरकारने सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारलेले असताना ज्या शेतकर्‍यांनी योजनांचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यातून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. राज्यात राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान राबवण्यात येत आहे. २0१३-१४ पयर्ंत या अभियानाअंतर्गत आणि २0१४-१५ मध्ये शेतावरील पाणी व्यवस्थापन उपअभियानाअंतर्गत सूक्ष्म सिंचन योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या हिश्शाचे प्रमाण ८0:२0 असे होते. २0१५-१६ मध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन) राबवण्याचे निश्‍चित केले आणि अनुदानाचे प्रमाण ५0:५0 असेल, असे कळवले. ठिबक सिंचन अनुदानाच्या वाटपासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण निधी अपुरा पडल्याने अजूनही हजारो शेतकर्‍यांना ते मिळालेले नाही. कमी पाण्यावर जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि शासकीय योजनांच्या पूर्ततेसाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून ठिबक सिंचन योजना शेतकर्‍यांच्या माथी मारण्यात आली. दरम्यान, या योजनेच्या स्वरुपात थोडा बदल करताना शासनाने अवर्षणप्रवण आणि अवर्षणाबाहेरील जिल्ह्यासाठी अनुदानाच्या टक्केवारीत बदल केला आणि अवर्षणप्रवण जिल्ह्यातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना या योजनेसाठी ६0 टक्के अनुदान, तर अवर्षणाबाहेरील जिल्ह्यांसाठी ४५ टक्के अनुदान निश्‍चित करण्यात आले. यासाठी सन २0१६-१७ या वर्षासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार लाभार्थीची निवड होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी सन २0१४-१५ आणि २0१५-१६ या वर्षांंसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अट नसताना आणि प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्यानुसार लाभार्थीची निवड करण्याचे स्पष्ट निर्देश नसतानाच मालेगाव तालुक्यातील चार हजारांवर शेतकर्‍यांनी या योजनेंतर्गत अर्ज करून आणि प्रसंगी कर्ज काढून ठिबक व तुषार संच बसवले. आज ना उद्या अनुदान मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार सिंचनासाठी एकरी ४५ ते ५0 हजार रुपयांपयर्ंत खर्च केला. यासाठी शेतकर्‍यांनी सावकार आणि बँकांचे उंबरठे झिजवले, पण अजूनही मालेगाव तालुक्यातील २0१४-१५ मधील एक हजार, तर २0१५-१६ मधील एक हजार ५0 शेतकर्‍यांना अनुदानाचा छदामही मिळालेला नाही. पाणीटंचाईतून मार्ग काढण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा पर्याय उपलब्ध आहे. शेतकर्‍यांकडून मागणी झाल्यास त्यांना तात्काळ ही सुविधा देण्याच्याही सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र त्या कागदावरच राहत आहेत. सुक्ष्म सिंचन योजनेच्या अनुदानाचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांना प्राप्त निधीतून अनुदानाचे वाटप केले आहे. मागील दोन वर्षांंत या योजनेसाठी अर्ज करणारे हजारो लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. हे वास्तव आहे; परंतु शासनाकडून निधीच मिळत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही. -संतोष वाळके, तालुका कृषी अधिकारी, मानोरा