उंबर्डाबाजार (वाशिम): येथून जवळच असलेल्या मौजे पिंपरी वरघट येथील भास्कर विश्वनाथ भोयर (वय ५९ वर्षे) या शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावानजिकच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.मृतक शेतकरी भास्कर भोयर यांच्या नावे सहा एकर कोरडवाहू शेतजमीन असून तिच्यावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज आहे. दोन मुली एक मुलगा, व पत्नी असा परिवार असून यामधील दोन मुलींचे लग्न झाल्याने त्यांच्यावरील कर्ज वाढले होते. याप्रकरणी लक्ष्मण भोयर यांच्या फिर्यादीवरून कारंजा ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीणचे ठाणेदार गुल्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.
पिंपरी वरघट येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: April 13, 2017 20:33 IST