कार्ली (वाशिम):वाशिम तालुक्यातील सर्वाधिक गारपीटग्रस्त कार्ली गावात दोन महिने उलटूनही अद्याप या आपादग्रस्तांना मदत मिळाली नसल्याने शेतकर्याची आर्थिक कोंडी होत आहे.त्यामुळे शेतकरी भगवान कदम यांनी आत्महत्या केली.तरीही तेथे मदत वाटप होण्याची लक्षणे दिसत नाहीत. वाशिम तहसिलअतंर्गत कार्ली, किनखेडा येथे फेब्रुवारीत झालेल्या गारपिटीचा प्रचंड फटका बसला आहे त्यावेळी पिकाचे पंचनामेही झाले, याद्याही बनवल्या.कार्ली येथील जवळपास १ हजार एकरावरल ४१८ लाभार्थी शासकीय मदतीस शेतकरी पात्र ठरले होते. कार्लीतील गारपीटग्रस्तांना ६५ ते ७0 लाख रुपयाची मदतरुपात मिळणार होती. कार्ली वगळता इतर शेजारील गावांना मदतीचे वाटप होउन महिनाही लोटला, पण कार्ली येथील गारपीटग्रस्तांना अद्यापही मदत मिळाली नाही.
कार्ली येथील गारपीटग्रस्त क्षेत्राची व शेतकर्यांची यादी बनवली आहे. मात्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत सद्यस्थितीत संपलेली आहे. येत्या एक दोन दिवसात शासनाकडून धनादेश आल्यास कार्ली येथील शेतकर्यांच्या मदतीबाबत प्राधान्य देण्याचे तहसीलदार आशिष बिजवल यांनी सांगीतले.