शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

न उगवलेल्या बियाण्यांचा अखेर शेतकर्‍यांना मोबदला!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:13 IST

यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यासंदर्भातील अहवालाची पाहणी करून तब्बल अडीच महिन्यांनंतर महाबीजने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहाबीजने घेतली दखलनुकसानग्रस्तांचे खाते क्रमांक, नावे संकलित करण्यास प्रारंभ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यासंदर्भातील अहवालाची पाहणी करून तब्बल अडीच महिन्यांनंतर महाबीजने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी त्यांचे खाते क्रमांक आणि नावे संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात लोकमतने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून घेतलेले अनेक शेतकर्‍यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मानोरा तालुक्यातील ९0, वाशिममधील ३२, रिसोडमधील ८ आणि मालेगावातील ७ अशा १३७ शेतकर्‍यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकाराची  जिल्हा परिषदेच्या २८ जून रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली होती. या सभेत जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही दुजोरा दिला होता, तर सभेच्या पीठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्‍यांना दिले होते. त्यानंतर तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली आणि त्या संदर्भातील अहवाल परीक्षणासाठी महाबीजकडे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आला; परंतु तीन आठवडे उलटल्यानंतरही याची दखल घेण्यात आली नसल्याने ‘लोकमत’च्यावतीने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करून शेतकर्‍यांना न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय महाबीजने घेतला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍याने जेवढे बियाणे घेतले असेल, तेवढय़ा बियाण्याची रक्कम संबंधित शेतकर्‍याला मिळणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्‍यांचे नाव आणि खाते क्रमांक घेण्यात येत आहेत. 

 यंदाच्या खरीप हंगामात महाबीजच्या न उगवलेल्या बियाण्यांची रक्कम भरपाई म्हणून देण्यास महाबीजने मान्यता दिली आहे. ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांचे खाते क्रमांक आणि नाव प्राप्त करून घेण्यात येत आहेत. -नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी,-