रिसोड (वाशिम): भारत माध्यमिक शाळा रिसोडचा विद्यार्थी अभिनव पत्रे यांचा धावणे व लांब उडी स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याबद्दल दि आर्य शिक्षण संस् थेचे सचिव तथा माजी खासदार अनंतराव देशमुख यांच्या हस्ते देशमुख यांच्या रिसोड येथील जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला.अभिनव पत्रे याने २00 मीटर धावण्याच्या स्पर्धेत विभागीय स्तरावर विजय मिळविला आहे. यानंतर पत्रे हा राज्यस्तरावर धावण्याच्या स्पर्धेत पात्र ठरला आहे. तसेच लांब उडी स्पर्धेत सुद्धा राज्यस्तरावर अमरावती येथे विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. लांब उडी स्पर्धेत सुद्धा अभिनव पत्रे याने विजय संपादन केला आहे.
धावपटूचा सत्कार
By admin | Updated: November 16, 2014 23:23 IST