शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
4
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
5
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
6
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
7
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
8
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
9
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
10
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
11
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
12
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
13
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
14
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
15
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
16
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
17
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
18
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
19
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
20
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार

नाट्यचळवळीचा लोकाश्रयही ओसरला

By admin | Updated: May 17, 2014 23:11 IST

वाशिमच्या नाट्यक्षेत्राला पूर्वीसारखा राजाश्रय तर नाहीच परंतु लोकाश्रयही ओसरला आहे.

वाशिम : नाट्यक्षेत्रात आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी वाशिम येथील नाट्यचळवळ आजघडीला विविध कारणांमुळे ह्यऑक्सिजनह्णवर असल्याचे दिसून येते. टीव्हीचा वाढता प्रसार, रसिकांची बदललेली अभिरूची, लोप पावलेला रसिकाश्रय व औषधालाही शिल्लक नसलेला राजाश्रय यातून या नाट्यपरंपरेची पडझड झाली आहे. येथील नाट्कलांवत मंडळांनी सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणार्‍या पुणे-मुंबईच्या नाट्यगृहात प्रयोग लावण्याचे धाडस केले होते. तेथील सृजनशील रसिकांनी हे प्रयोग डोक्यावर घेत वाशिमकर कलावंताच्या यशाची पावती दिली. याची दखल आचार्य अत्रे यांनी यांच्या ह्यमी कसा घडलोह्ण या आत्मचरित्रात घेऊन वाशिमच्या नाट्यचळवळीचा गौरव केला आहे. वाकाटकांची राजधानी असलेल्या या नगरीत कला, साहित्याला प्रोत्साहन मिळाल्याने पुरातन काळापासून विद्या, कला व साहित्याचे माहेरघर म्हणून वाशिम (वत्सगुल्म) ओळखले जात असे. प्रसिद्ध संस्कृत कवी व नाटककार राजशेखर याचे वाशिम हे आजोळ आहे. पुरातन काळात वैभवाप्रत पोहोचलेल्या वाशिमच्या नाट्यक्षेत्रात १८८0 च्या दरम्यान बाळशास्त्री हरदास यांनी श्री. करुणेश्‍वर प्रासादिक वाशिमकर संगीत मंडळीची स्थापना करून वाशिमच्याच नव्हे तर राज्याच्या नाट्यक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. बाळशास्त्री यांच्यासोबत गोविंद दीक्षित, गणेश देशपांडे, गोपाळराव मराठे, शिवाजी मराठे यासारखे राज्यभर गाजलेले नट या कंपनीत काम करीत. स्वत: बाळशास्त्री हे नटाचे काम करीत तर दामुअण्णासारखा नटीचा काम करणारा नट ही राज्याच्या नाट्यवतरुळाला या कंपनीने दिलेली अनूपम भेट आहे. हा काळ वाशिमच्या कलावतरुळाचा सुवर्णकाळ मानला जातो. त्यानंतरही वाशिमच्या कलाक्षेत्रात अनेक चढउतार होत होते. त्यानंतरच्या १९६५ ते ८५ च्या कालखंडात सुरुचित साधना या नाट्यसंस्थेने नावलौकीक मिळवला. हे मंडळ डॉ. ह.त्र्यं. खरे यांनी स्थापन केले होते. १९८0 च्या दरम्यान येथील नाट्यचळवळीत डॉ. रवि जाधव, धनंजय खरे, दिलीप देशमुख, बाबुजी (एकनाथ) कदम, छाया काळे, मंगल इंगोले, साहेबराव खोब्रागडे, रोहिणी खरे, विकास देशपांडे, नाना काळे, एस.एम.आहाळे आदींनी राजशेखर नाट्य मंडळाची स्थापना केली. या मंडळाने सादर केलेले ह्यमाझी घरटी माझी पिल्लंह्ण, ह्यभोवराह्ण, ह्यखामोश अदालत जारी हैह्ण. ह्यवल्लभपूरची दंतकथाह्ण ह्यडागह्ण, ह्यघोटभर पाणीह्ण यासारख्या एकांकिका गाजल्या. या संस्थेतील एस.एम. आहाळे आजघडीला देशातील आघाडीचे चित्रपट कथाकार आहेत. त्यांनी हम आपके है कौन, मैने प्यार किया, यासह राजश्री प्रॉडक्शनच्या इतर चित्रपटासाठी लेखन केलेले आहे. १९८९ मध्ये चंद्रकांत देशमुख, श्रीपाद पुराणकर, अँड. राम काळू, दिलीप चव्हाण आदी कलांवतांनी युवाशक्ती कलासंच स्थापन करून काही काळ चळवळ पुढे चालू ठेवण्यास योगदान दिले. ही नाट्यचळवळीची अखेरची घरघर होती. आज वाशिमच्या नाट्यक्षेत्राला पूर्वीसारखा राजाश्रय तर नाहीच परंतु लोकाश्रयही ओसरला आहे.