शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय व कारागृहातही कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 19:48 IST

वाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचित राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा कारागृहात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.

ठळक मुद्देछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना२२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक कोणताही शेतकरी वंचित राहू नये म्हणून अर्ज भरण्याची सुविधा 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी व २५ हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. कोणताही शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी वंचित राहू नये म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा कारागृहात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.२२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज न भरल्यास कर्जमाफीच्या लाभापासून संबंधित शेतकºयांना वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेले, कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा सामान्य रुगणालयात आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच वाशिम कारागृहातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या कैद्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी कारागृहात सुध्दा ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी सर्वप्रथम अर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकºयांची नाव नोंदणी करून घेण्यात येते. त्यानंतर आॅनलाईन अर्ज भरले जातात. मात्र आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नाव नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झालेले अनेक शेतकरी आहेत. आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकºयाला कर्जमाफी अथवा २५ हजार रुपयेपर्यंतच्या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळू शकणार नाही.बँकेमध्ये आॅफलाईन अर्ज सादर केलेल्या शेतकºयांनी सुद्धा आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. पात्र शेतकºयाने घेतलेले पीक कर्ज कोणत्याही बँकेचे असले तरी कर्जमाफी व प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आॅनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी भरण्यात आलेल्या आॅनलाईन अर्जांमधील त्रुटींची दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या त्रुटींची दुरुस्तीही २२ सप्टेंबर २०१७ पर्यंतच करणे आवश्यक आहे. संबंधित शेतकºयांनी २२ सप्टेंबरपर्यंत आॅनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले.