शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

दांडियाच्या नावावर फोफावतेय डान्स संस्कृती!

By admin | Updated: October 14, 2015 01:59 IST

लोकमत परिचर्चेत मान्यवरांचा सूर; गरबा व दांडियांची होतेय स्पर्धा.

वाशिम : कधी काळी भक्तीमय वातावरणात व श्रद्धापूर्वक साजरा होत असलेल्या दुर्गा उत्सवात कालांतराने आधुनिकता आली. भक्तीमय वातावरणात गरबा नृत्य खेळल्या जात असे मात्र आधुनिकतेच्या या युगात युवक-युवतींमध्ये गरबा व दांडीया खेळण्याची स्पर्धा सुरु झाली. गरबा व दांडियाच्या नावावर चक्क डान्स संस्कृती फोफावत असल्याची चिंता व्यक्त करीत असल्याचा सूर लोकमतच्या परिचर्चेत मान्यवरांनी काढला. स्थानिक लोकमत जिल्हा कार्यालयात १३ ऑक्टोबर रोजी दुर्गोत्सवाचे बदलते स्वरुप या विषयावर परिचर्चा आयोजित करण्यात आली होती. या परिचर्चेत शहरातील अनिल धुमकेकर, श्रीनिवास व्यास, दिनेश काशिकर, रविंद्र पेंढारकर, गजानन चव्हाण व सुरेश जावळे या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. घटस्थापनेपासून विजयादशमी दरम्यान नउ दिवस संपूर्ण भारतात नवरात्री उत्सव उत्साहात, धार्मिक भक्तीमय वातावरणात दुर्गोत्सवाचे आयोजन करुन भक्ती व संस्कृतीचे जतन करण्याची परंपरा आहे. नवदुर्गा, नवरागिनी, नवशक्ती अशा नउ रुपात नारी शक्तीचे महत्व यातून प्रकट होतो. पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांसह भारतातील सर्वच राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मोठय़ा प्रमाणात नवरात्री दुर्गोत्सव साजरा होत असतो. आदीशक्ती माता दुर्गा म्हणजेच स्त्रीशक्ती की जी या विश्‍वाची निर्मिती आहे. म्हणून तिला पुजण्याची ही भारतीय वैदीक परंपरा असल्याचे मत व्यक्त करीत अलिकडच्या काळात आधुनिकतेच्या मागे लागून दुर्गोत्सव भक्तीमय वातावरण हटविण्याची खंत परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी व्यक्त केली. गरबा नृत्यातील सोज्वळपणा व धाद्गमकता लोप पावली असून गरबा व दांडियाच्या नावावर मात्र डान्स संस्कृती फोफावत असून दुर्गोत्सवातील भक्ती व संस्कृतीचा र्‍हास होत असल्याचा सूर परिचर्चेत सहभागी मान्यवरांनी आवळला.