शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महसूल यंत्रणेवर अन्य विभागातील कामांचे अतिरिक्त ओझे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 20:21 IST

वाशिम - महसूल यंत्रणेकडे अन्य विभागांची कामे सोपविण्यात येत असल्याने महसूल अधिकारी व कर्मचाºयांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. 

ठळक मुद्दे कर्मचा-यांना अतिरिक्त कामाचा ताण महसूल विभागातील कामे रेंगाळण्याची शक्यतासंघटनांनी शासनाकडे मांडल्या व्यथा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - महसूल यंत्रणेकडे अन्य विभागांची कामे सोपविण्यात येत असल्याने महसूल अधिकारी व कर्मचाºयांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे. जमीनविषयक कामे करणे, जमिनविषयक कामांची नोंद ठेवणे, महसूल जमा करून सरकारी तिजोरीत भरणे, कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही महसूल यंत्रणेची मुख्य कामे मानली जातात. अलिकडच्या काळात महसूल यंत्रणेवर अन्य विभागांची कामे सोपविली जात असल्याने मूळच्या कामांकडे थोडे दुर्लक्ष होत असल्याचा सूर महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांमधून उमटत आहे. महसूल यंत्रणेवर महसूल कामांव्यतिरिक्त सद्यस्थितीत अनेक बिगर महसूली कामे सोपविली आहेत. कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळणे, पोलीस ठाणे तपासणी, पोलिस विभागाशी संबंधित कामे, सार्वजनिक सण आणि उत्सव  बैठका घेणे,  संचारबंदी आणि मनाई आदेश, मोर्चे, रॅली आंदोलनाबाबत कामे, विशेष कार्यकारी दंडाधिकारी नेमणुका, क्रिमिनल दावे, राजकीय व इतर खटले घेण्याचे कामकाज, अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत सरकारी अभियोक्ता पॅनल, सार्वजनिक उपद्रव्य, स्फोटके, परवाना नुतनीकरण, नाहरकत दाखले आणि दुर्घटनाबाबत कामकाज, अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा, शस्त्र परवाना, शोभेची दारु विषयक कामे, खाद्यगृह व लॉजींंग परवाना, शस्त्र अधिनियम, विशेष कार्यकारी अधिकाºयांची नेमणुक, स्वातंत्र्य सैनिक पेन्शन, मदत, नाट्यगृह, स्थळ परवाना, सादरीकरण परवाना, सर्कस प्रदर्शने परवाना, क्रिमिनल केसेसबाबतची कामे, आठवडा बाजार भरवणे, पुढे ढकलणे, नवीन यात्रा परवानगी, जिल्हा समादेशक होम गार्ड, पद्म पुरस्कार, जीवनरक्षा यासह अन्य पुरस्कार अहवाल, नाफेड तूर खरेदी केंद्रासंदर्भात शेतकºयांच्या तूरीची पडताळणी करणे आदी बिगर महसूली कामांचे ओझे महसूल यंत्रणेवर टाकण्यात आले. परिणामी, महसूलविषयक कामांची ‘पेंडन्सी’ वाढण्याची भीती महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे व्यक्त केली जात आहे. बिगर महसूल कामांचे ओझे कमी करण्याचा सूर महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनेमधून उमटत आहे. यासंदर्भात राज्य, विभाग व जिल्हास्तरीय संघटनांनी प्रशासनामार्फत शासनाकडे व्यथाही मांडल्या आहेत.