शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुसरा डोस लसीकरणाकरिता २६ सप्टेंबरपर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

शहरात ११ ते २० सप्टेंबर दरम्यान विक्रमी १२ हजार नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आले. ...

शहरात ११ ते २० सप्टेंबर दरम्यान विक्रमी १२ हजार नागरिकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्यात आले. समता फाउंडेशन, रिसोड नगर परिषद व जिल्हा परिषद वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने रिसोड शहरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देण्याचा कार्यक्रम ११ सप्टेंबरपासून शहरातील पाच लसीकरण केंद्रांवर सुरू आहे. २० सप्टेंबरपर्यंत समता फाउंडेशनने बारा हजार नागरिकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण केले होते. ५ जून ते २७ जून या काळात समता फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण रिसोड तालुक्यांमध्ये तीस हजार नागरिकांचे पहिल्या डोसचे लसीकरण नि:शुल्क करण्यात आले होते. यामध्ये रिसोड शहरातील १७ हजार नागरिकांचा समावेश होता. या १७ हजार नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख ही ११ ते २६ सप्टेंबरदरम्यान येत होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण करणे सरकारी लसीकरण केंद्रावर शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन समता फाउंडेशनने शहरातील नागरिकांसाठी कोविशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोसची व्यवस्था केली. शहरातील भारत माध्यमिक शाळा, श्री उत्तमचंदजी बगडिया महाविद्यालय, अल्लामा इक्बाल स्कूल, विश्वालॉन व एमएआयटी निजामपूर या पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे उभारून दहा दिवसांमध्ये १२ हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण केले. महालक्ष्मी व गणपती उत्सवामुळे रिसोड शहरातील बऱ्याच नागरिकांना समता फांउडेशनतर्फे सुरू असलेल्या लसीकरण उपक्रमात २० सप्टेंबरपर्यंत कोविशिल्डची दुसरी लस घेता आली नाही. परिणामी मागील लसीकरणात पहिली लस घेतलेल्या १७ हजार नागरिकांपैकी आजपर्यंत ११ हजार नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून, अद्याप अंदाजे ६ हजार नागरिकांनी लस घेतलेली नाही. या सर्वांचा विचार करून समता फाऊंडेशनने लोकआग्रहास्तव लसीकरण मोहीम रविवार २६ सप्टेंबरपर्यंत श्री उत्तमचंदजी बगडिया महाविदयालय, नगरपरिषद शाळा व एमएआयटी निजामपूर अशा फक्त ३ लसीकरण केंद्रावर लसीकरण ९ ते ६ या वेळेत सुरू ठेवले आहे. या अंतिम संधीचा लाभ रिसोड शहरातील नागरिकांनी घ्यावा व आपले व आपल्या परिवाराचे कोरोनापासून रक्षण करावे, असे आवाहन समता फांउडेशनतर्फे करण्यात आले आहे.