शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांच्या प्रवासभत्त्याचा ‘वनवास’ संपुष्टात

By admin | Updated: February 4, 2016 01:19 IST

वन विभागातील गस्तीवरच्या कर्मचा-यांना १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार.

संतोष वानखडे / वाशिम: वनक्षेत्राचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून गस्तीवर राहणार्‍या वनविभागाच्या कर्मचार्‍यांना फेब्रुवारीपासून १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्‍यांना याचा लाभ होणार आहे. भूमीच्या पोटात शिरून मानवाने अनेक धातू शोधून काढले, कृत्रिम पाऊस पाडला. काही प्रमाणात मानवाने निसर्गावर विजयही मिळविला; मात्र असे करताना त्याचे वन संवर्धन व संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने वनक्षेत्रात घट येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक असलेले ३३ टक्के वनक्षेत्र वाशिमसह महाराष्ट्र आणि देशातही नाही. यापुढे वनक्षेत्रात घट येणार नाही, याची दक्षता म्हणून वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील मेडशी, वाशिम व कारंजा परीक्षेत्रात बर्‍यापैकी वनराई आहे. या वनांचे संवर्धन, संरक्षण करण्याची जबाबदारी वनविभागातील वनपरीक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर सोपविली आहे. वनांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्‍यांना गस्तीवर राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय ते गस्त या दरम्यानचा प्रवास या कर्मचार्‍यांना स्वखर्चाने करावा लागत असल्याने भुर्दंड सोसावा लागत होता. याचा परिणाम साहजिकच गस्तीवरही होत असे. गस्त करणार्‍या वन कर्मचार्‍यांना कायम प्रवास भत्ता देण्याची मागणी शासनस्तरावर विविध संघटनांनी लावून धरली. या मागणीची दखल म्हणून फेब्रुवारी २0१६ पासून वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल, सहायक लागवड अधिकारी या संवर्गातील कर्मचार्‍यांना प्रतिमाह १५00 रुपये कायम प्रवास भत्ता मंजूर झाला असून, वाशिम जिल्ह्यातील जवळपास ५0 कर्मचार्‍यांना याचा फायदा होणार आहे. कायम प्रवास भत्त्याच्या रकमेचा कुणी गैरफायदा घेणार नाही, यासाठी सहायक वनसंरक्षक किंवा सहायक संचालकांनी विशेष लक्ष ठेवावे, असे निर्देश वन व महसूल विभागाने दिल्याचे उच्चपदस्थ अधिकार्‍यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.