शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

अखर्चित २८.९५ कोटींचा निधी मिळणार ; जि.प. ची विकासकामे मार्गी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:45 IST

वाशिम : विहित मुदतीत खर्च न झाल्याने शासन जमा केलेला २८.९५ कोटींचा अखर्चित निधी जिल्हा परिषदेला परत मिळणार आहे. ...

वाशिम : विहित मुदतीत खर्च न झाल्याने शासन जमा केलेला २८.९५ कोटींचा अखर्चित निधी जिल्हा परिषदेला परत मिळणार आहे. यामुळे प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाबरोबरच शासनाकडून विविध योजनेंतर्गत निधी प्राप्त होतो. हा निधी दोन वर्षांच्या कालावधीत खर्च करणे बंधनकारक आहे. सन २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून जिल्हा परिषदेच्या १० विभागांना १३४.०२ कोटींचा निधी मिळाला. हा निधी सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापर्यंत खर्च होणे आवश्यक होते. दोन वर्षांचा कालावधी असतानाही विविध कारणांमुळे हा निधी ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च झाला नाही. कोरोना परिस्थिती व नियोजनास विलंब यामुळे विहित मुदतीत २८.९५ कोटींचा निधी खर्च होऊ शकला नाही. हा निधी अखर्चित राहिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाला शासनजमा करावा लागला. एकीकडे ग्रामीण भागाच्या विकासासाठी निधी मिळत नसल्याची ओरड आहे तर दुसरीकडे शासनाकडून मिळालेला कोट्यवधींचा निधीही विहित मुदतीत खर्च होत नसल्याने त्यावेळी ग्रामीण भागातून संतप्त प्रतिक्रियादेखील उमटल्या होत्या. आता अखर्चित म्हणून शासन जमा केलेला २८.९५ कोटींचा निधी परत मिळणार असल्याने प्रलंबित विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास पदाधिकारी, प्रशासनामधून व्यक्त केला जात आहे.

.........

आतापासूनच नियोजन आवश्यक !

अखर्चित निधी विहित मुदतीत खर्च व्हावा याकरिता आतापासूनच नियोजन होणे आवश्यक आहे. पदाधिकारी -अधिकाऱ्यांच्या समन्वयातून अखर्चित असलेला २८.९५ लाखांचा निधी आता तरी विहित कालावधीत खर्ची पडावा, अशी अपेक्षा ग्रामीण जनतेतून व्यक्त होत आहे.

........

कोट

सन २०१९-२० मध्ये जि.प. मध्ये प्रशासक होते. तेव्हा एक वर्ष निधी खर्च होऊ शकला नाही. त्यानंतर मिळालेला कमी वेळ व कोविड परिस्थितीत काही तांत्रिक अडचणीमुळे नियोजन करूनही निधी खर्च होऊ शकला नव्हता. अखर्चित निधी खर्च करण्याला मुदतवाढ मिळाल्यामुळे आमदार अमित झनक यांच्या मार्गदर्शनात नियोजित कामे पूर्ण करण्यात येतील.

- चक्रधर गोटे

सभापती, शिक्षण व आरोग्य

जि.प. वाशिम