शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदामामध्ये आढळली मुदतबाहय़ कीटकनाशके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:50 IST

मालेगाव : येथील तालुका कृषी विभागाच्या परिसरातील  गोदामामध्ये मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले  फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा  प्रकार शेतकरी भगवान बोरकर यांनी प्रकाशझोतात आणला  आहे. 

ठळक मुद्दे मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : येथील तालुका कृषी विभागाच्या परिसरातील  गोदामामध्ये मुदतबाह्य कीटकनाशके तसेच खराब झालेले  फवारणी यंत्र आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हा  प्रकार शेतकरी भगवान बोरकर यांनी प्रकाशझोतात आणला  आहे. भगवान बोरकर हे काही कामानिमित्त मंगळवारी तालुका कृषी  विभागात गेले असता, त्यांना एका ट्रकमध्ये कुजलेले व  गोदामामध्ये पडून राहून खराब झालेले फवारणी यंत्र (हॅण्ड पं प) हे भंडार विभागातील लोखंडे यांच्या देखरेखमध्ये ट्रकमध्ये  भरणे सुरू असल्याचे दिसून आले. बोरकर यांनी याबद्दल  विचारणा केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली.  यावेळी गोदामाची पाहणी केली असता, त्यामध्ये मोठय़ा संख्येने   खराब अवस्थेतील हॅण्ड पंप आढळून आले. पीक  फवारणीकरिता असलेली कीटकनाशकेसुद्धा खराब झालेले व  मुदतबाह्य असलेले आढळून आले. या प्रकरणातील दोषींवर  कारवाई करण्याची मागणी बोरकर यांनी केली. 

 काही हॅण्ड पंप हे निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकर्‍यांनी ते परत  केले होते. संबंधित कंपनीने सदर हॅण्ड पंप परत घेऊन जावे,  असे वारंवार संबंधित कंपनीला कळविले. पत्रव्यवहारही केला.  याउपरही सदर साहित्य नेण्यात आले नाही. साहित्य निकृष्ट  असल्याने संबंधित कंपनीला पेमेंट अदा करू नये, यासंदर्भात  वरिष्ठांशी पत्रव्यवहार केलेला आहे. सदर साहित्य परत घेऊन  जाण्यासाठी सोमवारी संबंधित कंपनीचा ट्रक आला होता.  निकृष्ट साहित्य परत घेऊन जाताना तेथे काही शेतकरी आले.  यावरून गोंधळ उडाला. गैरसमज होऊ नये म्हणून त्या गोदामाला  सील लावण्यात आले. यासंदर्भातील माहिती वरिष्ठांना देण्यात  आली.- संतोष वाळकेतालुका कृषी अधिकारी मालेगाव

 

टॅग्स :agricultureशेती