शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी सभासदांच्या उद्दिष्टपूर्तीची कसरत !

By admin | Updated: January 21, 2017 02:29 IST

सेवा सहकारी सोसायटीचे सभासद करण्याचे केवळ ४२ टक्के उद्दिष्ट साध्य.

वाशिम, दि. २0- जिल्हय़ातील सात-बाराधारक शेतकर्‍यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने आखलेल्या मोहिमेने ४२ टक्के उद्दिष्टपूर्ती साधली असून, अद्याप ५८ टक्के उद्दिष्ट गाठावयाचे आहे.अर्थव्यवस्थेला बळकटी आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यात सहकारी संस्थांची मोलाची भूमिका आहे. शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून गावपातळीवर सेवा सहकारी सोसायट्या स्थापन केल्या जातात. वाशिम जिल्ह्यात ४२४ सेवा सहकारी सोसायट्या आहेत. या सोसायटीचे सभासद होण्यासाठी काही अटी असून, अनेक सात-बाराधारक शेतकरी अद्याप सोसायटीचे सभासद झाले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९८ हजार सातबाराधारक शेतकरी आहेत. सातबाराधारक शेतकर्‍यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने ह्यअँक्शन प्लॅनह्ण तयार केला. ऑक्टोबरपासून या ह्यअँक्शन प्लॅनह्णची अंमलबजावणी सुरू झाली. यासंदर्भात सहकार विभागाने उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी वेळोवेळी उपनिबंधक कार्यालयाला सूचना दिल्या. पहिल्या टप्प्यात २५ हजार शेतकर्‍यांना सेवा सहकारी संस्थेचे सभासद करून घेण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. आतापर्यंंत १0५00 च्या आसपास सभासद करण्यात उपनिबंधक कार्यालयाला यश आले असून, अद्याप उर्वरित शेतकर्‍यांना सभासदत्व देणे बाकी आहे. तालुकास्तरीय कार्यालयातर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात आहे. सभासद झाल्यानंतरच्या फायद्याची माहिती शेतकर्‍यांना दिली जात आहे. तथापि, अद्याप उद्दिष्टपूर्ती झाली नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे विभागाने स्पष्ट केले.नोटाबंदीचा निर्णय झाल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात शेतकरी विविध अडचणीत सापडले होते. ऐन रब्बी हंगामात नोटाबंदीमुळे शेतकर्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे सेवा सहकारी सोसायटीचे सभासद बनविण्याच्या मोहिमेलादेखील फटका बसला.सेवा सहकारी सोसायटीचे गाव व तालुकानिहाय नव्याने नेमके किती सभासद झाले, याची इत्यंभूत माहिती उपलब्ध होण्याला आणखी काही दिवस कालावधी लागणार आहे. त्यानंतर मोहिमेची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.