शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळपीर येथे पोषण महोत्सव अभियान उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:47 IST

मंगरूळपीर : तालुक्यातील नवीन सोनखास येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोषण महोत्सव अभियान ...

मंगरूळपीर : तालुक्यातील नवीन सोनखास येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पोषण महोत्सव अभियान महिला मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच आशाताई महाकाळ, तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सुभाष पवने, ग्रामसेवक पंडित राठोड, सचिन सुर्वे, सुभाष गोटे, अमित इंगोले, पर्यवेक्षिका लताताई चौधरी, अनिता भोयाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका चौधरी यांनी महिला व बालकांचे आरोग्यपूर्ण जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध उपक्रम राबविते, या उपक्रमांची माहिती व्हावी यासाठी हा पोषण महोत्सव साजरा करण्यात येत आहे, यामध्ये महिलांनी आपले व आपल्या बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोणता आहार घेणे आवश्यक आहे, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी दोन मुली असलेल्या मातांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तसेच परसबागेतून पोषण आहाराबाबत

मार्गदर्शन करून अंगणवाडी स्तरावर पोषण अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. यादरम्यान महिलांनी सुंदर व प्रबोधनात्मक रांगोळी काढून जनजागृती केली, तसेच कडधान्य, भाजीपाला व पाककृतीबाबत पालकांचे व मातांचे समुपदेशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन हर्षा भोजने यांनी केले, तर आभार छाया इंगोले यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अंगणवाडी सेविका जोत्स्ना बोरकर, ढोबळे, मंजू चव्हाण, सुनीता देवळे, सिंधूताई तवर, भारती, अनिता विटकरे, भुजाडे, संगीता भगत, लता भगत, उंदरे, अवगन आदींचे सहकार्य लाभले.