शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

२८ दिवसांत २० हजार स्त्राव नमुन्यांची तपासणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST

जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. ...

जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बाधितांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात संकलित केलेले स्त्राव नमुन्यांची लवकरात लवकर तपासणी करण्यासाठी वाशिम येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील (आरटीपीसीआर लॅब) अधिकारी, कर्मचारी मेहनत घेत आहेत. दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरू असून ७ फेब्रुवारी ते ६ मार्च या कालावधीत २० हजार ११५ स्त्राव नमुने प्रयोगशाळेत तपासले गेले. १० ऑक्टोबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वाशिम येथील आरटी-पीसीआर प्रयोगशाळेचे ऑनलाइन स्वरुपात औपचारिक उद्घाटन झाले. सुरुवातीचे काही दिवस प्रयोगशाळेत दिवसाला ३०० नमुन्यांची तपासणी होत होती. त्यानंतर ही क्षमता टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात आली असून आता दिवसाला सरासरी १२०० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्रयोगशाळेमध्ये प्राप्त होणारे नमुने वेळेत तपासून त्याचे अहवाल तातडीने देण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या मार्गदर्शनात व आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. किशोर लोणकर व डॉ. बालाजी हरण यांच्या नेतृत्वात कोरोना योद्ध्यांची टीम सज्ज असून दोन शिफ्टमध्ये प्रयोगशाळेचे कामकाज सुरू आहे. प्रयोगशाळेत आतापर्यंत एकूण ६७ हजार ४५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. गेल्या २८ दिवसांच्या कालावधीतील आरटी-पीसीआर चाचण्यांचा विचार करता अमरावती विभागात वाशिम जिल्हा क्रमांक दोनवर आहे. ७ फेब्रुवारी ते ६ मार्च दरम्यान पहिल्या सप्ताहात १५३१ नमुने तपासले गेले, टप्प्या-टप्प्याने यामध्ये वाढ होऊन २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या सप्ताहात ८ हजार ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली.