शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळणार संगणक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:39 IST

वाशिम : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टिकोणातून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना संगणक दिले जाणार आहे.

ठळक मुद्दे‘पेपरलेस’ कामकाज बाबुगिरीला बसणार चाप 

वाशिम : ई-प्रणाली अंतर्गत जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज ‘पेपरलेस’ करण्याच्या दृष्टिकोणातून प्रत्येक अधिकारी, कर्मचाºयांना संगणक दिले जाणार आहे. पेपरलेस कामकाजाच्या अनुषंगाने राज्यस्तरावर प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला असून, प्रत्येक जिल्ह्यात तांत्रिक अधिकारी नेमण्यात आले आहेत.  

प्रशासकीय कामकाजाला संगणकाची जोड मिळाल्यानंतर आता संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस’ करण्याबरोबरच कामकाजात पारदर्शकता, गतिमानता आणणे, कामचुकार कर्मचारी व बाबुगिरीला चाप बसविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयात वर्ग एक ते वर्ग तीन या श्रेणीतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांना संगणक दिले जाणार असून, संगणकाच्या माध्यमातूनच संपूर्ण कामकाज केले जाणार आहे.  संबंधित कर्मचाºयांना कोडवर्ड, पासवर्ड दिला जाणार असून, कोणती फाईल कुठे प्रलंबित आहे, याची माहिती त्या-त्या विभागाच्या प्रमुखांना केव्हाही पाहता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक आदींना एखादी फाईल किंवा प्रस्ताव कोणत्या स्तरावर आहे, नेमका कुण्या अधिकारी किंवा कर्मचाºयांकडून विलंब होत आहे, याची माहिती संगणकावरच मिळणार आहे. ५५ वर्षाआतील प्रत्येक अधिकारी व कर्मचाºयांना संगणकीय कामकाज बंधनकारक असल्याने बोगस संगणक प्रमाणपत्र सादर करणाºया कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

निवेदन, तक्रार किंवा पत्रव्यवहार यांची छानणी करणे आणि सदर निवेदन, तक्रार संबंधित विभागाकडे स्कॅनिंग केल्यानंतर संगणकाच्या माध्यमातून सादर करण्यासाठी जिल्हास्तरावरच स्वतंत्र यंत्रणा (डाक) निर्माण केली जाणार आहे. या यंत्रणेला ‘जिल्ह्याची डाक’ असे नाव दिले जाणार असून, येथून निवेदन, तक्रारींचा प्रवास संबंधित विभागाकडे होणार आहे. पेपरलेस कामकाजाची कार्यवाही पुर्णत्वाकडे नेण्यासाठी शासनाने प्रत्येक विभागाला एक तांत्रिक अधिकारी दिले असून, वाशिम जिल्हा परिषदेची जबाबदारी  दीपक वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. साधारणत: जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर पेपरलेस कामकाजाला प्रारंभ होणार असून, १ एप्रिल २०१८ पासून पेपरलेस कामकाज सुरू होईल, असा अंदाज वाशिम जिल्हा परिषद प्रशासनाने वर्तविला. पेपरलेस कामकाजाच्या दृष्टिने योग्य ती कार्यवाही सुरू असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार