शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरीय तपासणीनंतरच ‘त्या’ घटनेचा होणार उलगडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:08 IST

मृतक ही गर्भवती असल्याचे निष्पन्न; माहेरी झाले अंतिम संस्कार

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: येथील शासकीय तंत्रनिकेतन परिसरातील एका विहिरीत शनिवार, १९ आॅगस्ट रोजी महिला व तिच्या २ वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह आढळला होता. मृत महिलेची ओळख पटली असून, ताई राजू तायडे (वय २०, रा. अमानी ता. मालेगाव जि. वाशिम), आराध्या राजू तायडे (वय २ वर्षे) असे मृतकांची नावे आहेत. विशेष म्हणजे मृतक महिलेला आठ महिण्याचा गर्भ असल्याचे समोर आले असून उत्तरीय तपासणी अहवालानंतर या घटनेचा उलगडा होणार आहे.वाशिम ते रिसोड मार्गावर असलेल्या शासकीय तंत्र निकेतन परिसरातील एका विहिरीमध्ये महिला आणि छोट्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती शहर पोलीसांना १९ आॅगस्ट रोजी सकाळी मिळाली होती. दोघींचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. मृतक महिलेचे पोट चांगलेच फुगलेले होते. ते पाण्यामुळे की सदर महिला गर्भवती असल्यामुळे, याचा उलगडा ओळख पटल्यानंतर किंवा शवविच्छेदनानंतरच शक्य होता. या घटनेची माहिती वृत्तपत्र व सोशल मिडीयाच्या माध्यमातून अमानी येथील नातेवाईकांना मिळाली. मृतक महिलेचा पती राजू तायडे हा आपल्या कुटूंबासह वाशिम शहर पोलीस स्टेशनला आला असता त्याला मृत महिलेचे व तीच्या मुलीचे फोटो दाखविले असता त्याने सदर महिला ही पत्नी असून चिमुकली ही माझी मुलगीच असल्याचे सांगितले. मृतक ताई तायडे ही १८ आॅगस्ट रोजी सकाळी १० वाजता अमानी येथून तामसी येथील आपल्या मावशीकडे जात असल्याचे आपल्या पतिला सांगितले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतक ताई तायडे हिचे माहेर येवती (ता. रिसोड जि. वाशिम) असून तीचे आई-वडील तिच्या लग्नापूर्वीच स्वर्गवासी झाले. तिला दोन भाऊ असून ते दोघेही भाऊ मुंबई येथे मजुरी करून आपले कुटूंबाचे पालन पोषण करतात. अशा बिकट परिस्थितीत ताई तायडे हिने आत्महत्या केल्यामुळे तिच्या दोन्ही भावांवर दु:खाचा डोंगर कोसळला. मृतक महिलेच्या भावांनी आपल्या बहिणीला सासरकडील मंडळीचा त्रास असल्यामुळेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा आरोप पोलिसांजवळ केला. अंत्यविधी आटोपल्यानंतर लेखी स्वरूपात तक्रार देण्याचा सल्ला पोलिसांनी दिला असल्याचे मृतक महिलेचा भाऊ लखन गौतम पाईकराव यांनी सांगितले. लेखी स्वरूपात तक्रार दाखल करण्यासाठी रात्री उशिरा लखन पाईकराव व त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसले होते. लेखी तक्रार व उत्तरीय तपासणी अहवालानंतर या घटनेचा उलगडा होईल. एक-दोन दिवसात उत्तरीय तपासणीचा अहवाल मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.