शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नकाशात नसतानाही तहसीलदाराच्या आदेशाने काढला शेतातून रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:48 IST

मंगरुळपीर तालुक्यातील सार्सी बोथ येथील रहिवासी रामहरी भोयर व किसन भोयर यांची सार्सी गट क्रमांक १०१ शेतशिवारात शेतजमीन असून, ...

मंगरुळपीर तालुक्यातील सार्सी बोथ येथील रहिवासी रामहरी भोयर व किसन भोयर यांची सार्सी गट क्रमांक १०१ शेतशिवारात शेतजमीन असून, गट क्रमांक ११३ मध्ये जाण्यासाठी रस्ता अडवल्याची तक्रार त्यांच्या विरोधात गैरअर्जदारांनी दाखल केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, मध्यंतरी तत्कालीन तहसीलदार बागडे यांनी कोविड-१९ संसर्ग असल्यामुळे प्रकरण सुनावणीकरिता घेतले नाही; परंतु विद्यमान तहसीलदारांनी २८ ऑगस्ट रोजी साप्ताहिक सुटी असताना पोलीस बंदोबस्तासह गैरअर्जदाराला शेतात पाठवले. त्यातही रस्ता हा धुऱ्याने देण्याचे आदेशात नमूद असताना गैर अर्जदाराने शेतामधील उभे असलेले पीक ट्रॅक्टरने नेस्तनाबूत करून रस्ता काढला. विरोध केला असता शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारागृहात टाकण्याची धमकी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिली. हा सर्व प्रकार बेकायदेशीर असून, तहसीलदारांच्या पाठबळामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप तक्रारकर्ते रामहरी भोयर व किसन भोयर यांनी केला आहे, तसेच आसेगाव पोलिसांत या प्रकरणाची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनीही तक्रार दाखल करून घेतली नाही, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

०००००००००००००००००

कोट : सार्सी बोथ येथील शेतरस्त्याप्रकरणी केलेली कार्यवाही ही नियमाला अनुसरून आणि कायद्यानुसारच केली आहे. कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने वा आकसापोटी ही कार्यवाही केलेली नाही.

-नरसय्या कोंडागुर्ले,

तहसीलदार, मंगरुळपीर

००००००००००००००००००००

कोट: सार्सी बोथ येथील गट क्रमांक १०१ मधून गट क्रमांकात ११३ मध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या नकाशावरून स्पष्ट होते. याप्रकरणी न्यायालयात दाखल प्रकरणाचा निकाल प्रलंंबित असतानाही शेतातून नियमबाह्य पद्धतीने रस्ता काढण्याची कार्यवाही करण्यात आली.

-रामहरी भोयर,

शेतकरी, सार्सी