शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या परीक्षेतही मुलीच टाॅपर; जिल्हा विभागात ठरला अव्वल! ९७ शाळांचा निकाल १०० टक्के

By सुनील काकडे | Updated: June 2, 2023 15:36 IST

रिसोड जिल्ह्यात सर्वाधिक पुढे

वाशिम : यंदा २५ मे रोजी १२वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मुलांच्या तुलनेत अधिक राहिली. शुक्रवार, २ जून रोजी जाहीर झालेल्या दहावी परीक्षेच्या निकालातही तेच चित्र कायम राहत मुलींनी अग्रक्रम प्राप्त केला आहे. विशेष बाब म्हणजे अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांच्या यादीत गतवर्षीप्रमाणे यंदाही वाशिमने प्रथम क्रमांकावर येण्याचा बहुमान प्राप्त केला. ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला, हे विशेष.

वाशिम जिल्ह्यातील ३३० शाळांमधील १० हजार ६६३ मुले आणि ८ हजार ५१३ मुली असे एकंदरित १९ हजार १७६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १० हजार ५३९ मुले आणि ८ हजार ४२७ मुलींनी परीक्षा दिली. त्यातून ९ हजार ९१० मुले आणि ८१४४ मुली असे एकूण १८ हजार ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.०३ टक्के असून मुलांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९६.६४ इतकी आहे.

दरम्यान, अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिमने पहिल्या क्रमांकाचा ९५.१९ टक्के निकाल दिला आहे. ३३० शाळांपैकी ९७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या ५३ ने घटली आहे. याशिवाय एकूण निकालातही गतवर्षीच्या तुलनेत २.४३ टक्क्यांची घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९२.६२ टक्के लागला होता; तर यंदाचा निकाल ९५.१९ टक्के इतका आहे.वाशिम तिसऱ्या; तर रिसोड पहिल्या क्रमांकावर

दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या तुलनेत बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही रिसोड तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी हा मान वाशिम तालुक्याला मिळाला होता. यंदा मात्र वाशिम तालुका तिसऱ्या क्रमांकावर गेला आहे.शिक्षणाचे माहेरघर सहाव्या क्रमांकावर

जिल्ह्यात शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणारा कारंजा तालुका बारावीच्या निकालाप्रमाणेच दहावीच्या निकालातही सहाव्या क्रमांकावर फेकला गेला. अन्य पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजाने ९३.२८ टक्के निकाल दिला असून या तालुक्यातील १६ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.