शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवस उलटूनही पीक नुकसानीचे पंचनामे अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:41 IST

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस ...

राज्यातील बहुतांश भागांत १९ ते २१ मार्च आणि २२ ते २३ मार्चदरम्यानच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पाऊस पडला. लाखो हेक्टर क्षेत्रातील रबी पिकांसह भाजीपाला आणि फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यात वाशिम जिल्ह्यात २७ महसूल मंडळातील १६९ गावांतील गहू, हरभरा या रबी पिकांसह भाजीपाला पिके, तसेच टरबूज, खरबूज, पपई, संत्रा, लिंबू आदी फळपिकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला असून, तसा प्राथमिक अहवालही शासनाकडे पाठविला आहे. तथापि, १० दिवस उलटले तरी तालुकास्तरावरून जिल्हास्तरावर अंतिम अहवालच सादर करण्यात आला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे पूर्ण होऊन शासनाकडे अंतिम अहवाल सादर होणार केव्हा आणि शेतकऱ्यांना मदत मिळणार केव्हा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-------------

नुकसानीचे ३० टक्के पंचनामे प्रलंबित

जिल्ह्यात ६८८० हेक्टर क्षेत्रातील रबी पिके, भाजीपाला पिके आणि फळपिकांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे; परंतु ३० मार्चपर्यंतही यापैकी केवळ ७० टक्के क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले असून, उर्वरित ३० टक्के क्षेत्रातील पंचनामेच झाले नसल्याने तालुकास्तरावरून अंतिम अहवालच प्राप्त होऊ शकला नाही.

--------------------

कोट : मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यानंतर झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने २७ महसूल मंडळांतील १६९ गावांतील ६८८० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचा प्राथमिक अहवाल शासनस्तरावर पाठविला आहे. काही भागातील पंचनामे अद्याप झाले नाहीत. आज तालुकास्तरावरून अहवाल मागवून शासनाकडे निधीची मागणी नोंदवू.

-शैलेश हिंगे,

निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

-------------

प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र

गावे - १६९

महसूल मंडळे - २७

बाधित क्षेत्र - ६८८० हेक्टर

--------------------

या पिकांना बसला फटका

भाजीपाला,

गहू,

टरबूज,

खरबूज,

काकडी,