वाशिम : पावित्र्य , मांगल्य अन् उत्साहाचे प्रतिक असलेल्या दूर्गोत्सवासह शारदोत्सवास गुरूवारी देवीच्या मुर्ती स्थापन क रून सुरुवात झाली. ढोलताशांच्या निनादात मॉ दुर्गांचे जिल्ह्यात आगमन झाले असून, पुढील आठ दिवसांसाठी देवीचा जिल्ह्यात मुक्काम राहणार आहे. सोबतच युवक-युवतींमध्ये खास आकर्षण असलेल्या दांडीयाची या दिवसांमध्ये धूम राहणार आहे. जिल्ह्यात शहर व खेडेगाव मिळून तब्बल ३७४ ठिकाणी सार्वजनीक नवदूर्गा मंडळांनी तर ९ ठिकाणी शारदादेवीची विधिवत पुजा अर्चा करुन स्थापना केली. सायंकाळपर्यंत दूर्गोत्सवाच्या स्थापनेचे काम विविध ठिकाणी सुरु होते. जिल्ह्यातील सर्व नवदूर्गा मंडळांनी यावर्षीच्या नवदूर्गाउत्सवाला जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम करण्याचे ठरविले आहे.
दुर्गेची स्थापना
By admin | Updated: September 26, 2014 00:42 IST