शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन अनुदानाची प्रतिक्षा संपेना 

By admin | Updated: May 13, 2017 18:36 IST

जिल्ह्यातील वास्तव: तीन महिन्यांपासून प्रस्तावाची पडताळणी प्रलंबितच 

जिल्ह्यातील वास्तव: तीन महिन्यांपासून प्रस्तावाची पडताळणी प्रलंबितच वाशिम: शासनाने मागील वर्षीच्या खरीप हंगामात बाजार समितीत १ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपये आणि कमाल २५ क्विंटलपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भातील प्रस्ताव ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांकडून मागवून जिल्हा उपनिबंधकांमार्फत पणन संचालकांकडे २८ फे ब्रुवारी पर्यंत पाठविणे आवश्यक असताना तीन महिने उलटले तरी, प्रस्ताव पणन संचालकांकडे पोहोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या अनुदानासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान मिळण्यासाठी सोयाबीन विक्रीपट्टीसह आपला सात-बारा उतारा, आपले बँक बचत खाते क्रमांकासह सोयाबीन विक्री केलेल्या संबंधित बाजार समितीकडे अर्ज सादर केले आहेत. या योजनेत शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार केल्यानंतर तालुका सहायक निबंधकांनी प्रस्ताव तपासून जिल्हा उपनिबंधकांना द्यावयाचे आहेत. त्यानुसार बाजार समित्यांनी मागील महिन्यात त्यांच्याकडे आलेल्या प्रस्तावांची तपासणी करून ते अर्ज तालुका निबंधकांकडे सादर केले आहेत; परंतु अद्याप हे प्रस्ताव जिल्हास्तरावर पोहोचले नाहीत.  वाशिम जिल्ह्यातून ५३९६१ शेतकऱ्यांनी बाजार समित्यांकडे अर्ज सादर केले आहेत. तालुका सहायक निबंधकांकडे या अर्जांची पडताळणी सुरू आहे. तीन महिने उलटत आले तरी तालुका सहनिबंधकांकडून अर्जांची पडताळणी पूर्ण करून ते जिल्हास्तरावर सादर करण्यात आले नसल्याची माहिती वाशिमच्या जिल्हा उपनिबंधकांकडून प्राप्त झाली आहे.  शेतकऱ्यांच्या सोयाबीन अनुदानाच्या प्रस्तावाची तालुकास्तरावरील पडताळणी उरकली असून, येत्या आठवडाभरात सर्व प्रस्ताव पणन संचालकांकडे सादर करण्यात येतील.-ज्ञानेश्वर खाडे,जिल्हा उपनिबंधक, वाशिम.