शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित ‘ई-क्लास’ जमिनीवर होणार वृक्षारोपण!

By admin | Updated: May 9, 2017 19:37 IST

वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी घेतला आहे.

वाशिम : देखभाल-दुरूस्ती व सरंक्षणासाठी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या ई-क्लास जमिनींवर वृक्षारोपण करण्याचा निर्णय वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी मंगळवारी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण निघण्यासोबतच वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होऊन  गावातील जनावरांसाठी गायरान देखील सुध्दा तयार होईल, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.ग्रामपंचायतीकडे निहित असलेल्या ई- क्लास जमिनीवर बऱ्याचदा शेतीसाठी व इतर कारणांसाठी अतिक्रमण झालेले असते. या जमिनीतील वृक्षतोडीमुळे गावातील गायरान नष्ट झाले आहे. या जमिनीवर पुन्हा नव्याने वृक्ष लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होईल आणि गायरान तयार झाल्यामुळे गावातील जनावरांना चारा उपलब्ध होईल. सद्या अतिक्रमित जमिनीवर कुठलेच पीक नसल्याने अतिक्रमणधारकांचे नुकसान होणार नाही. अतिक्रमण झालेल्या सर्व जमिनी ग्रामपंचायतने वृक्ष लागवडीसाठी आतापासूनच ताब्यात घेऊन त्यामध्ये खड्डे खोदून ठेवण्याच्या सुचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या आहेत. १ जुलै ते ७ जुलैदरम्यान वृक्ष लागवड सप्ताह राबविला जाणार असून या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान एक हजार वृक्ष लागवड करावी. त्यासाठी ३१ मे पुर्वी ग्रामसेवकांनी खड्डे खोदून तयार ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले आहेत.