शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारंजा आगार प्रमुखांविरुद्ध कर्मचारी आक्रमक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 01:11 IST

कारंजा लाड येथील आगारप्रमुखांकडून डयूटी अलोकेशन पद्धतीमुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेच्यावतीने आगारप्रमुखांकडे वारंवार चर्चा करूनही त्याचा  काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कारंजा शाखेने रविवारी सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देआंदोलनाचा इशारा संघटनेकडून सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: येथील आगारप्रमुखांकडून डयूटी अलोकेशन पद्धतीमुळे कर्मचारी वर्ग त्रस्त झाला आहे. या संदर्भात कर्मचारी संघटनेच्यावतीने आगारप्रमुखांकडे वारंवार चर्चा करूनही त्याचा  काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कारंजा शाखेने रविवारी सभा घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.  महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन आगार कारंजाचे कर्मचारी आगार व्यवस्थापक हे कर्मचार्‍यांबाबत पक्षपाती धोरण अवलंबून डयुटी अलोकेशनमध्ये कर्मचार्‍यांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत. या प्रकाराबाबत त्यांनी आगार प्रमुखां शी चर्चाही केली आहे. तथापि, त्याचा काहीच फायदा झाला नाही. आगारप्रमुखांच्या या धोरणाला कर्मचारी कंटाळून गेल्यामुळे त्यांनी सोमवारी सभेचे आयोजन केले आहे. या सभेत सर्व कर्मचार्‍यांच्यावतीने सामुहिक निर्णय घेऊन त्या संदर्भात आगारप्रमुखांना माहिती देण्यात येणार असून, त्यानंतरही वाहक, चालकांच्या ड्यूटी अलोकेशनसह इतर समस्यांबाबत विचार करून धोरणात बदल न केल्यास संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा  अध्यक्ष गजानन तिडके व सचिव संजय भिवरकर यांनी दिला आहे.

कर्मचार्‍यांना नियमानुसार आणि मनुष्यबळाचा विचार करून डयुटी देण्यात येते. इच्छेनुसार डयुटी लावणे शक्य नाही. आपण कोण्याही कर्मचार्‍याला वेठीस धरले नाही. - अभिजीत चौधरीआगारप्रमुख कारंजा