शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचारी कर्तव्याला जागले !

By admin | Updated: May 20, 2014 22:43 IST

सुरळीत वाहतुकीसाठी यंत्रणा सरसावली : कर्मचार्‍यांना दिल्या सूचना

वाशिम : शहरातील विस्कटलेल्या वाहतुकीची घडी निट बसविण्याची जबाबदारी असलेल्या शहर वाहतुक शाखेचीच घडी विस्कटली असल्याचे वृत्त २0 मे रोजी ह्यलोकमतह्णने प्रकाशित करताच, पोलिस विभागात एकच खळबळ उडाली. या वृत्ताची दखल घेत शहर वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सर्व कर्मचार्‍यांना कर्तव्याच्या वेळी चौकात हजर राहण्याचे तसेच यापुढे दांडीबाज कर्मचार्‍यांची गय करणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दरम्यान आज ह्यलोकमतह्णने चमूने केलेल्या पाहणीत कर्मचारी वेळेवर चौकात तैनात झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरातील वाहतुक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी शहर वाहतुक शाखेच्या खांद्यावर पोलिस विभागाने सोपविली आहे. एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि अन्य २४ कर्मचारी या जबाबदारीसाठी तैनात करण्यात आले आहेत. पूर्वीच्या तुलनेत तब्बल ७ ते ९ कर्मचारी अतिरिक्त देण्यात आले आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुक ताळ्यावर आणणे शहर वाहतुक शाखेला फारसे अवघड काम नाही. मात्र, तरीदेखील शहरातून तिबल सीट, फॅन्सी नंबरची वाहनं, गर्द काळ्या काचेची वाहनं, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी प्रवासी वाहनं वाहतुकीच्या नियमांना चिरडत सुसाट वेगाने धावत असल्याचे चित्र ह्यलोकमतह्णने स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आणले होते. या वृत्ताची दखल घेत सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तातडीने सर्व कर्मचार्‍यांना शहरातील वाहतुक सदैव सुरळीत ठेवण्याचे निर्देश दिले. शहरातील खड्डामय रस्त्यांचा तसेच विकासात्मक कामांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. या बाबीचा वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यात मोठा अडथळा येत असल्याचेही पवार यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. वाहतुकीच्या नियमांना चिरडणार्‍या वाहनांवरील कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचनाही पवार यांनी कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. कर्तव्याच्या वेळी कुणी हलगर्जीपणा करीत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्याला पहिले प्राधान्य द्या, अशा कानपिचक्या श्रीराम पवार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, आज कर्तव्य सुरू होण्याच्या वेळी प्रमुख चौकांमध्ये वाहतुक कर्मचार्‍यांची उपस्थिती आढळून आली. सायंकाळी ४.३0 वाजतानंतरदेखील कर्मचार्‍यांनी चौकात वेळेवर हजेरी लावून अवैध वाहनांवर कारवाई करण्याची मोहिम राबविली. गत आठवड्यापासून ३0 ते ४0 अवैध प्रवासी वाहनं, तिबल सीट, फॅन्सी नंबर व वाहतुकीचे नियम मोडणार्‍या एकूण ४५0 वाहनांवर कारवाई केली आहे.