शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांची लेखणी बंद!

By admin | Updated: March 16, 2017 03:00 IST

वाशिम जिल्हा परिषद लेखा कर्मचा-यांचे आंदोलन; लेखाविषयक कामकाजाचा खोळंबा

वाशिम, दि. १५- सहायक लेखा अधिकार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांप्रमाणे राजपत्रित दर्जा देण्यात यावा, यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषद लेखा संवर्गीय कर्मचार्‍यांनी १५ मार्चपासून लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटना जिल्हा शाखा वाशिमचे अध्यक्ष रामानंद ढंगारे यांनी दिली. लेखा कर्मचार्‍यांना राज्य शासनाच्या कर्मचार्‍यांप्रमाणे ग्रेड पे वरिष्ठ सहायक लेखा कर्मचार्‍यांना ४00 रुपये व सहायक लेखा अधिकारी यांना १00 रुपये वाढवून मिळावा, ग्रेड पे राज्य शासन कर्मचार्‍यांना ज्या दिनांकापासून मंजूर करण्यात आला, त्या दिनांकापासून मंजूर करण्यात यावा व यात झालेला भेदभाव संपुष्टात आणावा, जिल्हा कोषागार व उ पकोषागार कार्यालयाप्रमाणे गट स्तरावर लेखा विभागाचे कामकाज करण्यात यावे, गट स्तरावर सहायक लेखाधिकारी यांना विशेष वित्तीय अधिकार देण्यात यावे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वर्ग - ३ ची परीक्षा दरवर्षी नियमित घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत लेखा कर्मचार्‍यांचे जॉब चार्ट तयार करणे, पंचायत समिती स्तरावर लेखा अधिकारी वर्ग-२ चे पद निर्माण करणे आदी मागण्या शासन स्तरावर करण्यात आल्या आहेत; मात्र अद्यापही सकारात्मक निर्णय न झाल्याने राज्यस्तरावर विविध टप्प्यात आंदोलन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात १0 ते १४ मार्चदरम्यान काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यात १५ मार्चपासून कार्यालयात उपस्थित राहून लेखणी बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. बुधवारच्या लेखणी बंद आंदोलनात लेखा संवर्गातील सर्व कर्मचारी सहभागी होते.