शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन पीक नियोजन

By admin | Updated: July 6, 2014 23:30 IST

यावर्षी पावसाचा विचार करून पिकाचे नियोजन करावे असा सल्ला शेतकर्‍यांना कृषी अधिकारी यांनी दिला.

कारंजालाड : यावर्षी पावसाचा विचार करून पिकाचे नियोजन करावे असा सल्ला शेतकर्‍यांना कृषी अधिकारी एस.आर.धुळधुळे यांनी दिला.कारंजा तालुक्यामध्ये दरवर्षीचा विचार केल्यास जून महिन्याच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या हप्त्यात खरीप हंगमाच्या पेरण्या पूर्ण होत असतात. परंतु यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिना उजाडूनही पुरेसा पाऊस नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे पेरणीचे फेरनियोजन करण्याची वेळ शेतकरी बांधवावर आलेली आहे. मुंग, उडिद पिकाची सलग पेरणी ३0 जून पर्यंतच करावयाची असल्यामुळे शेतकरी बांधवांनी मुंग, उडिद पिकाची सलग पेरणी करू नये. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस आला तर मुंग, उडिद पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी व यावेळी २0 टक्के बियाणे जादा वापरावे. त्याचप्रमाणे कापूस पिकाची लागवड करताना खोल, मध्यमखोल, काळी जमिनीचाच वापर करावा. तसेच कापूस पिकामध्ये मुंग, उडिद, सोयाबीन या पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी. तसेच संपूर्ण क्षेत्रावर एकच पिक आंतरपिक म्हणून न घेता खालीलप्रमाणे नियोजन करावे. कापूस :ज्वारी :तूर: ज्वारी (६:१:१:१) १ जुलै ते ७ जुलैपर्यंत पाऊस लांबल्यास संकरीत किंवा देशी कापसाचे लवकर पक्व होणारे वाण वापरावे २0 टक्के बियाणे अधिक वापरून दोन झाडातील अंतर कमी ठेवावे. ७ जुलै ते १५ जुलै पर्यंत पाऊस लांबल्यास सोयाबीनची पेरणी करताना २,६ किंवा ९ ओळीनंतर तूर पिकाची आंतरपिक म्हणून पेरणी करावी. मुंग, उडीद ही पिके उथळ काळ्या जमिनीत लावावी असे आवाहन तालुका कृषी अधिकारी एस.आर.धुळधुळे यांनी केले आहे.