मंगरुळपीर : तालुक्यातील आसेगांव पोलीस स्टेशन अंर्तगत येत असलेल्या ग्राम पिंपळगांव इजारा येथे गावठी व देशी दारूचा महापुर वाहत होता.त्यामुळे गावातील कमी वयाचे मुल दारूच्या आहारी गेले होते.व अनेक महिलांचे संसारही उघड्यावर आले याच गोष्टीला वैतागलेल्या संतप्त महिलांनी आसेगावचे ठाणेदार शिवाजी लष्करे यांना भेटुन दारूबंदीचे निवेदन सादर केले. दारूबंदी संदर्भात आलेल्या तक्रारीची दखल घेत आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदारांनी पिंपळगावात जावुन सर्व महिलांना महिला ग्राम सुरक्षा दलाचे ओळखपत्र वितरण केले व त्यानंतर दारूबंदी मोहीम राबविण्यात आली.दारूबंदीच्या पुढाकारात फुलागाई चव्हाण,लक्ष्मीबाई पवार,देमीबाई चव्हाण,पार्वताबाई चव्हाण,यशोदाबाई राठोड,कलाबाई राठोड,विमलाबाई चव्हाण,शोभाबाई चव्हाण,शांताबाई चव्हाण,गंगाबाई आडे,केशरबाई आडे,मैनाबाई जाधव,गंगाबाई चव्हाण,शिवनबाई आडे,यांच्यासह प्रतिष्ठीत नागरिकांचा ही समावेश आहे.ठाणेदार शिवाजी लष्करे यांनी राबविलेल्या दारूबंदी मोहीमेत सहकार्य करण्याचे आश्वासन महिलांनी दिले.
पिंपळगांवच्या महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार
By admin | Updated: August 21, 2014 23:02 IST