शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारा सिंचन प्रकल्पाला जूनपूर्वी वीजपुरवठा!

By admin | Updated: March 19, 2016 01:11 IST

वाशिम जिल्हाधिका-यांनी दिली ग्वाही; पाणी असताना विजेअभावी उद्भवला सिंचनाचा प्रश्न!

देपूळ (जि. वाशिम): : वारा जहागीर सिंचन प्रकल्पस्थळी रखडलेले वीजपुरवठय़ाचे काम विनाविलंब मार्गी लावून जूनपूर्वी शेतकर्‍यांना सुरळीत वीजपुरवठा दिला जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. बुधवार, १६ मार्च रोजी प्रकल्पस्थळी आयोजित जलजागृती सप्ताहाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.वारा जहागीर बृहद् सिंचन प्रकल्पामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कर्ज काढून पाइप लाइनचे काम पूर्ण केले; मात्र वीजपुरवठा व विद्युत रोहित्र देण्यास महावितरणने टाळाटाळ चालविली आहे. दरम्यान, जलाशयामध्ये जलसाठा असताना केवळ विजेअभावी सिंचन करणे अशक्य होत असल्याने आमच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, अशी फिर्याद संबंधित शेतकर्‍यांनी वारा जहागीर येथील जलजागृती कार्यक्रमामध्ये सामुहिकरित्या जिल्हाधिकार्‍यांकडे मांडली. वारा जहागीर येथील सिंचन प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन प्रकल्पात मोठय़ा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे. यामुळे दुष्काळात होरपळत असणार्‍या शेतकर्‍यांनी खासगी कर्ज काढून तथा पत्नी, मुलींचे दागिने विकून पाइप लाइनचे ८0 टक्के काम पूर्ण केले. प्रकल्पाचा उत्तरेकडील भाग हा महावितरणच्या मंगरुळपीर उपविभाग अंतर्गत येतो. आसेगावच्या ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र परिसरातील सुमारे १00 शेतकर्‍यांनी दोन महिन्यांपासून वीजपुरवठय़ासाठी अर्ज केले. हे अर्ज अस्ताव्यस्त अवस्थेत आसेगाव येथील कार्यालयात धूळ खात पडले असून, एकही विद्युत रोहित्र मंजूर झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रकल्पाचा दक्षिणेकडील भाग हा अनसिंग उपकेंद्र अंतर्गत येत असून, या विभागाने ८ नवीन विद्युत रोहित्रे मंजूर केली आणि कोटेशन देऊन शेतकर्‍यांकडून पैसे भरून घेतले; परंतु वीजपुरवठा अद्याप त्यांना मिळालेला नाही.