शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

बारा गावांचा वीजपुरवठा प्रभावित

By admin | Updated: November 22, 2015 02:00 IST

दोन वर्षांंपासून कु-हा येथील ३३ के व्ही वीज उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित.

विवेकानंद ठाकरे / रिसोड (जि. वाशिम): तालुक्यातील कुर्‍हा येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचा प्रस्ताव तब्बल दोन वर्षापासून मंजूर असूनसुद्धा प्रलंबित आहे. यामुळे १२ गावाचा विद्युत समस्येबाबत प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात वीज ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र त्या तुलनेत उपकेंद्र व रोहित्रांमध्ये वाढ करण्यात येत नाही. परिणामी, काही उपकेंद्रांवर अधिक भार येत असल्याने नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागतो. विदर्भ व मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या १२ गावांचा विद्युत पुरवठय़ाचा प्रश्न बर्‍याच दिवसांपासून रेंगाळात आहे. गावामध्ये विद्युत आहे; मात्र विद्युत दाब कमी प्रमाणात आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा असल्याचा कोणताच फायदा होत नाही. यासंदर्भात माजी मंत्री सुभाष झनक यांनी विशेष प्रयत्न करुन ग्राम कुर्‍हा येथे ३३ केव्हीचे उपकेंद्र १६ ऑगस्ट २0१३ रोजी मंजूर केले होते. महावितरण मुख्यअभियंता एस.पी. नागटिळक यांच्या स्वाक्षरीने मंजुरीचे पत्र देण्यात आले होते. सदर काम प्रस्तावित आराखडा २ अंतर्गत मौजे कुर्‍हा ता.रिसोड येथील ३३/११ केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचा समावेश केलेला आहे. सदर प्रस्तावाचा समावेश करण्याला दोन वर्षे पुर्ण होवूनही प्रत्यक्षात कामाला मात्र सुरुवात झाली नाही. याबाबत महावितरणने २ एकर शेती खरेदी केली आहे. शेती खरेदी केल्यानंतरही १ वर्षापासून कामाच्या मुहरूत मिळाला नाही. ग्रामीणभागामध्ये शेतीकरिता विद्युत समस्या बिकट बनली असून, नागरिकांना तासनतास भारनिमनाचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात अधिक्षक अभियंता व अभियंता विद्युत कंपनी र्मया. रिसोडचे सि.एम. पाठक यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.