शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाच्या कामांवर विजेची चोरी!

By admin | Updated: June 18, 2017 01:56 IST

नाली बांधकाम; पैसा वाचविण्यासाठी महावितरणला गंडा.

नंदकिशोर नारे लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरात कोट्यवधी रुपयांची विकास कामे जोरात सुरू आहेत. गल्लीबोळीत व रहदारी नसलेल्या रस्त्यांवरील कामांवर चक्क वीज चोरी करून नाली बांधकाम केले जात असल्याचे ह्यलोकमतह्णने १६ जून रोजी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून स्पष्ट झाले.वाशिम शहरामध्ये नगरपरिषदेच्यावतीने विविध विकास कामांना सुरुवात केली आहे. यामध्ये रस्ते, भूमिगत गटार योजना, नाली बांधकाम, नालीवरील पुलांच्या बांधकामासह अनेक कामे जोमात सुरु आहेत. सदर कामे करताना ठेकेदारांच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या तारांवर आकोडे टाकून वीज वापरल्या जात असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून, ह्यलोकमतह्णच्या चमूने अनेक भागात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी योजना दीप कॉलनीमध्ये नालीचे बांधकाम पूर्ण झाले असून, नागरिकांच्या घरासमोर जाण्या-येण्याकरिता धापा टाकण्याचे काम सुरू आहे. धापा टाकण्यासाठी लावण्यात येत असलेल्या सेंट्रिंगच्या लाकूड कटाईसाठी चक्क वीज वितरण कंपनीच्या खांबावरील तारांवर आकोडे टाकून कामे आटोपल्याचे दिसून आले. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असून, याकडे कुणाचेही लक्ष नसून, कोणीही फिरकून पाहत नाही. नाली बांधकाम होऊन जवळपास १५ दिवस झाले, तरी नागरिकांना उड्या मारुनच घरात जावे लागत आहे. संबंधित सुपरवायझरशी चर्चा केली, की आज- उद्या होऊन जाईल, असे सांगितल्या जात असल्याचे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नालीचे बांधकाम करणार्‍यांकडे जनरेटर आहे. बर्‍याचदा त्याचा वापरही केला जातो; परंतु कधी छोटे-मोठे काम असल्यास तेवढय़ासाठी काय जनरेटर बोलावावे म्हणून टाळल्या जाते. अशावेळी वीज चोरी करुन काम उरकून घेतले जात असल्याचे आढळून आले. या वीज चोरीचा फटका ग्राहकांनाच बसत आहे.महावितरणच्या डोळयातही धुळफेकशहरातील फिडरवर असलेले कनिष्ठ अभियंता, अधिकारी व कर्मचारी दररोज आपल्या भागात कुठे वीज चोरी सुरु आहे का, याची पाहणी करतात. १६ जून रोजी वीज वितरण कं पनीचे अभियंता व्यवहारे परिसराची पाहणी करुन गेले होते, तेव्हा सर्व सुरळीत होते. ते गेले ना गेले काम करणार्‍यांनी आपला कार्यक्रम पार पाडला. यामुळे वीज वितरण कंपनीला चांगलाच फटका बसत आहे.जे कंत्राटदार वीज चोरी सारखे चुकीचे काम करीत असतील त्यांना ताकीद दिल्या जाईल व कायदेशीर काम करण्या संदर्भात सुचना केल्या जातील.- के.आर. गाडेकर, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग,वाशिम.