शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

बॅरेजेस परिसरातील विजेचा प्रश्न निघणार निकाली!

By admin | Updated: April 1, 2017 02:34 IST

ऊर्जा मंत्र्यांचे सुतोवाच; ९५.८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन

सुनील काकडे वाशिम, दि. ३१- जिल्ह्यातून वाहणार्‍या पैनगंगा नदीवर शासनाने ७१६.४२ कोटी रुपये खचरून ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. यामुळे कधीकाळी वाहून जाणारे पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडवून ठेवणे शक्य झाले आहे; मात्र विजेअभावी हे बॅरेजेस ह्यवांझोटेह्ण ठरल्याची बाब सर्वप्रथम ह्यलोकमतह्णने उजागर केली. त्यावर मेहकर (जि. बुलडाणा) येथील आमदार संजय रायमुलकर यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करून हा प्रश्न लावून धरला. दरम्यान, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यास दुजोरा देत यासंबंधी ९५.८९ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले.वाशिम जिल्हा हा तापी व गोदावरी नदी खोर्‍याच्या दुभाजकावर येतो. जिल्हय़ात सिंचनाचा प्रचंड मोठा अनुशेष आजही कायम आहे. तो दूर करण्यासाठी पैनगंगा नदीवरील वरुड, जुमडा, कोकलगाव, अडगाव, गणेशपूर, राजगाव, उकळीपेन, सोनगव्हाण, टनका, ढिल्ली आणि जयपूर अशा ११ ठिकाणी ह्यबॅरेजेसह्णची कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे वाशिम जिल्हय़ातील ५ हजार ५५४ हेक्टर व हिंगोली जिल्हय़ातील २ हजार १३६ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. डिसेंबर २0१५ मध्ये या प्रकल्पांना ह्यसुप्रमाह्ण प्रदान करून शासनाने ७१६.४२ कोटी रुपयांचा निधी प्रदान केला. त्यामुळे ही कामे वेळेत पूर्ण होऊन त्यात मोठय़ा प्रमाणात जलसाठा झाला आहे. तथापि, सिंचनाच्या बाबतीत "माईलस्टोन" काम ठरू पाहणार्‍या "बॅरेजेस"च्या उपलब्धीमुळे शेकडो गावांमधील शेतकर्‍यांनी हरितक्रांतीचे स्वप्न रंगविणे सुरू केले; मात्र विजेच्या पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कोट्यवधी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या ह्यबॅरेजेसह्णची उपयोगिता शून्य ठरली आहे. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यास उत्तर देताना ऊर्जामंत्र्यांनी सांगितले, की वाशिम जिल्हय़ात पैनगंगेवरील बॅरेजेससह अनेक लघू पाटबंधारे योजना व उपसा सिंचन योजना पूर्णत्वास येत आहेत. त्यानुषंगाने किमान आठ हजार कृषी पंपांची मागणी येण्याची शक्यता असून, त्यास वीज पुरवठा देण्याकरिता विजेच्या पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. त्यासाठी ९५.८९ कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लवकरच विजेसंदर्भातील हा प्रश्न निकाली निघण्याचे संकेत असून, यामुळे वाशिम आणि हिंगोली या दोन्ही जिल्हय़ांतील शेतकर्‍यांची सोय होणार आहे. विजेसंदर्भातील या कामांना द्यावे लागणार प्राधान्य गणेशपूर, जयपूर आणि नारेगाव या तीन ठिकाणी ३३/११ ह्यकेव्हीह्णचे तीन वीज उपकेंद्र उभारावे लागणार आहेत. त्यावर पाच ह्यएमव्हीएह्णचे सहा ट्रान्सफार्मर आणि १00 ह्यकेव्हीएह्णचे ९४२ ट्रान्सफार्मर बसवावे लागणार आहेत. याशिवाय अडोळी आणि वाई येथे पाच ह्यएमव्हीएह्णचे दोन अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसविणे, नव्याने तयार होणार्‍या उपकेंद्रापर्यंंत वीज पुरवठा करण्यासाठी ३३/११ ह्यकेव्हीह्णची विद्युत लाइन टाकण्यासह इतरही बरीच कामे प्रथम प्राधान्याने करावी लागणार आहेत.