शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच निवडणुकीने वातावरण तापले

By admin | Updated: August 22, 2015 01:17 IST

सरपंचपदाला अर्थकारणाची झालर ; सहा टप्प्यात निवडणुका.

वाशिम : गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी क्षमली असली तरी सरपंचपदाच्या निवडीसाठी राजकारण तापले आहे. १६३ ग्रामपंचायतीमधील सरपंच निवडणुकीची प्रक्रिया जिल्ह्यात सहा टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात १९ आॅगस्ट रोजी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक झाली आहे. आता २३ ते ३० आॅगस्ट दरम्यान उर्वरित १६१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची जिल्ह्यात निवडणूक होत आहे.१४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना येत्या काळात मिळणार असल्याने सरपंचपदाला नेहमीच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक महत्त्व आले आहे. दुसरीकडे तालुकानिहाय सरपंचपदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायतींची मुदत संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.सरपंचपदाच्या निवडीसाठी विजयी सदस्यांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यात पुढील काळात २३, २६, २८, २९ आणि ३० आॅगस्ट अशा पाच टप्प्यात सरपंचपदाची निवडणूक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सदस्यांची जुळवाजुळव करण्यासोबतच ग्राम पातळीवर राजकारण तापले आहे.दुसरीकडे आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा २३ जुलै रोजी राज्य निवडणूक आयोगाने केली होती. नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायती अविरोध झाल्या होत्या. त्यामुळे १५४ ग्रामपंचायतींच्या १२८१ सदस्यांसाठी प्रत्यक्षात ही निवडणूक झाली होती. त्यापूर्वी २४४ सदस्यांची अविरोध निवड झाल्याने प्रत्यक्षात १५२५ पैकी १२८१ सदस्यांच्या निवडीसाठी ही निवडणूक झाली होती. चार आॅगस्ट रोजी झालेल्या या मतदानासाठी जिल्ह्यातील दोन लाख ७८६०४ मतदारांपैकी प्रत्यक्षात दोन लाख चार हजार ८८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६ आॅगस्टला मतमोजणी होऊन विजयी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती.दरम्यान, जिल्ह्यातील १६३ ग्रामपंचायतींपैकी रिसोड तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींची सरपंच पदाची निवडणूक झाली असून, उर्वरित ग्रामपंचायतीतील सरपंचपदासाठी आता ग्राम पातळीवर रस्सीखेच सुरू झाली आहे. तालुकानिहाय त्यासाठी वेगवेगळ््या तारखा जिल्हा निवडणूक विभागाने जाहीर केल्या आहेत.ग्रामपंचायतींचा १४ व्या वित्त आयोगाचा थेट निधी मिळणार असल्याने या सरपंचपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. राजकारणही तापले आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने निवडणुकीच्या अनुषंगाने नायब तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून नियक्त्याही केल्या असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.